पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून 'तो' धावत होता, पण नियतीने त्याआधीच गाठलं; कोल्हापुरात तरुणाचा दुर्दैवी अंत
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाला गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढायचं, हे एकच स्वप्न नंदवाळचा तरुण सुनील...
Kolhapur News : पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाला गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढायचं, हे एकच स्वप्न नंदवाळचा तरुण सुनील वामन कांबळे जगत होता. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्याची जिद्द मोठी होती. याच जिद्दीने तो रोज पहाटे उठून, शरीराला कसून तयार करत, आपल्या ध्येयाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत होता.
सोमवारची पहाट मात्र त्याच्यासाठी काळ बनून आली. नेहमीप्रमाणे तो वाशी-नंदवाळ मार्गावर धावण्याचा सराव करत होता. अवनी संस्थेजवळ पोहोचताच अचानक त्याच्या छातीत एक तीव्र कळ उठली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तो जमिनीवर कोसळला.
सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी धावपळ करत त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अवघ्या 32 व्या वर्षी एका ध्येयवेड्या तरुणाचा असा अंत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आहे, ज्यांच्या डोळ्यांतील स्वप्नंही त्याच्यासोबतच विझली. त्याच्या या अकाली जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून 'तो' धावत होता, पण नियतीने त्याआधीच गाठलं; कोल्हापुरात तरुणाचा दुर्दैवी अंत









