नसतं धाडस जीवावर बेतलं! रेल्वे रुळावर घातली गाडी, अडकला पाय अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, वाचा सविस्तर

Last Updated:

लाडगाव टोलनाक्याजवळ रेल्वे रुळ ओलांडून पायी जाण्यासाठी एक रस्ता आहे, त्यावरून एकाने नसतं धाडस दाखवत दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. रुळावर...

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News
करमाड (छत्रपती संभाजीनगर) : लाडगाव टोलनाक्याजवळ रेल्वे रुळ ओलांडून पायी जाण्यासाठी एक रस्ता आहे, त्यावरून एकाने नसतं धाडस दाखवत दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. रुळावर त्याची गाडी पडली आणि त्याचा पाय रुळात अडकला. त्याचवेळी जालन्याहून संभाजीनगरच्या दिशेने जाणारी रेल्वे भरधाव वेगाने आली आणि त्याखाली चिरडून दुचाकीस्वाराची मृत्यू झाला.
पत्नीला कामावरून आणण्यासाठी गेला अन्...
गणेश प्रभू कापसे (वय-35, रा. भायगव्हाण, ता घनसांगवी, ह.मु, लाहगाव, ता. संभाजीनगर) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. समोर आलेली माहिती अशी की, दोघेही पती-पत्नी शेंद्रा एमआयडीसीत एका खासगी कंपनीत काम करत होते.
रेल्वे रुळावर पडली गाडी आणि चिरडला गेला
गणेश कापसे दुपारी कामावरून घरी आले आणि त्यानंतर ते पत्नीला कंपनीतून घरी आणायला जात होते. संभाजीनगर-जालना महामार्गावर असणाऱ्या लाडगाव टोलनाक्याजवळून एमआयडीसीत जाण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला. धाडस केले आणि रेल्वे रुळावर गाडी चढवली. पाऊस सुरू होता, त्यामुळे रुळावर त्यांची गाडी घसरली आणि पाय अडकला. त्याचवेळेस जालन्याहून संभाजीनगरच्या दिशेने जाणारी रेल्वे भरधाव वेगाने आली आणि गणेश कापसे यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
नसतं धाडस जीवावर बेतलं! रेल्वे रुळावर घातली गाडी, अडकला पाय अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement