Ram Mandir: ISI कडून ट्रेनिंग, मटणवाल्या अब्दुलचा मोठा कट, राममंदिर निशाण्यावर होतं, त्याआधीच....

Last Updated:

सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तान आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती.

News18
News18
नवी दिल्ली:  अयोध्या राम मंदिरासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रामनवमीच्या आधीचा दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात यश आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला अटक केली आहे. अब्दुल रहमान (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. संशयिताला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली, जिथे तो दहशतवादी कट रचण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते, जे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने निष्क्रिय केले.
advertisement
अब्दुल रहमानने यापूर्वीही अनेकवेळा अयोध्येतील राम मंदिराची रेकी केली असून तेथील सुरक्षा व्यवस्थेच्या संबंधित महत्त्वाची माहिती ISI ला शेअर केली होती. राम मंदिरावर हँडग्रेनेडने हल्ला करून मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. ही कारवाई करण्यात गुजरात एटीएसची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एटीएसला एक संशयीत दहशतवादी भारतात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती, दहशतवादी संघटनेच्या सूचनेनुसार मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने सापळा रचून संशयिताला अटक केली.
advertisement

फैजाबादमध्ये चालवायचा मटणाचे दुकान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित अब्दुल रहमान हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता आणि तो अयोध्येतील राम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्यासाठी तयार होता. अटक करण्यात आलेल्या आरोपी फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तान आयएसआयने भारतात मोठा दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती.
advertisement

गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई

तपासानुसार अब्दुल रहमान फैजाबादहून ट्रेनने फरीदाबादला पोहोचला होता, तिथे एका हँडलरने त्याला हँडग्रेनेड दिले. ट्रेनने अयोध्येला जायचे आणि तिथे हल्ला करायची अशी योजना होती. याआधी सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली. गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत रविवारी अब्दुल रहमानला पकडले.

जैशकडून वारंवार धमक्या

advertisement
राम मंदिरसह काही प्रमुख प्रतिष्ठानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2005 मध्ये रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामागे जैश ए मौहम्मद याच संघटनेचा हात होता हे नंतर समोर आलं होतं. जैशकडून वारंवार अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Ram Mandir: ISI कडून ट्रेनिंग, मटणवाल्या अब्दुलचा मोठा कट, राममंदिर निशाण्यावर होतं, त्याआधीच....
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement