10 लाखांसाठी पोलिसाची क्रूरता, पत्नीसोबत अमानुष कृत्य, बीडमधील धक्कादायक घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: काही दिवसांपूर्वी पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात २३ वर्षीय विवाहित वैष्णवी हगवणेनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवी ही अजित पवार गटाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेची सून होती. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला जात होता. माहेरून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण देखील केली जात होती. सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजं असताना आता बीडमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे.
बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे. माहेरून दहा लाख रुपये आण, अशी मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पोलीस पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विनोद सखाराम कुटे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो बीड पोलीस दलात कार्यरत आहे. याप्रकरणी पत्नी रेणुका विनोद कुटे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सीता सखाराम कुटे, रोहिणी गोविंद गाडे आणि गोविंद बाबासाहेब गाडे असं गुन्हा दाखल झालेल्या इतर तीन आरोपींची नावं आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस पतीकडून दहा लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केला जात होता. आरोपी विनोद चारचाकी घेण्यासाठी रेणुकाचा छळ करत होता. माहेरून दहा लाख रुपये आण, अशी मागणी करत तो रेणुकाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 20, 2025 1:36 PM IST








