वाल्मीक कराडच्या चेल्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, बीडला हादरवणारी घटना!

Last Updated:

Crime in Beed: बुधवारी वाल्मीक कराडच्या चेल्याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराड तुरुंगात असला तरी त्याच्या टोळीकडून बाहेर सुरू असलेला उपद्रव कमी झालेला नाही. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराड टोळीच्या एका कुख्यात गुंडाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो हातात बंदूक घेऊन दहशत माजवताना दिसून आला होता. ही घटना घटना ताजी असताना आता बीडला हादरवणारी आणखी एक घटना समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बुधवारी वाल्मीक कराडच्या चेल्याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित तरुणी एका रुग्णालयासमोर उभी होती. एकट्या तरुणीला पाहून वाल्मीकच्या चेल्याची नियत बदलली. त्याने पीडित मुलीला आडबाजुला घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
नानासाहेब चौरे असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. त्याने २ जून रोजी एका गतीमंद तरुणीवर अत्याचार केला आहे. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात गेली होती. यावेळी ती काही काळ एका ठिकाणी थांबली होती. तिची नातेवाईक महिला पीडितेला आरोग्य केंद्राच्या बाहेर तिला थांबवून रुग्णालयात गेली होती.
advertisement
महिला उपकेंद्रात गेल्यानंतर नानासाहेब चौरे याने या गतिमंद तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अधिक तपास पोलीस करत आहेत.
आरोपी नानासाहेब चौरे हा वाल्मीक कराडचा समर्थक आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी वाल्मीक कराडसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. वाल्मीक कराड याच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली होती. यावेळी गावकरी आणि स्थानिक पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवलं होतं. वाल्मीकसाठी आंदोलन करणाऱ्या नानासाहेब चौरे यानेच एका तरुणीवर अत्याचार केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
वाल्मीक कराडच्या चेल्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, बीडला हादरवणारी घटना!
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement