उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरची वाईट नजर, सोनोग्राफी रुममध्ये नेलं अन् नको तेच केलं, नराधमावर गुन्हा दाखल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Bhandara: भंडारा जिल्ह्यातील साकोली याठिकाणी एका डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या १७ वर्षीय तरुणीसोबत नको तेच कृत्य केलं आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी भंडारा: भंडारा जिल्ह्यातील साकोली याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या १७ वर्षीय तरुणीसोबत नको तेच कृत्य केलं आहे. या प्रकरणी पीडितेनं साकोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी डॉक्टरचा शोध घेत आहेत.
डॉ. देवेश अग्रवाल असं गुन्हा दाखल झालेल्या ४५ वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. त्याचं साकोली इथं शाम हॉस्पिटल नावाचं रुग्णालय आहे. याच रुग्णालयात पीडित तरुणी आपल्या आईसोबत उपचारासाठी गेली होती. यावेळी आरोपीनं पीडितेला अश्लील स्पर्श करून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडितेनं आईसह तातडीने साकोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी खासगी रुग्णालयात आलेल्या एका १७ वर्षीय तरुणीची डॉक्टरनं छेड काढत तिचा विनयभंग केला. ही घटना भंडाऱ्या जिल्ह्याच्या साकोली इथं घडली आहे. या प्रकरणी डॉ. देवेश अग्रवाल (४५) त्याच्या विरुद्ध साकोली पोलिसात कलम ६४(२)(१),६५(१) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीची प्रकृती बरी नसल्यानं ती आईसोबत डॉ. देवेश अग्रवाल यांच्या शाम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. मात्र, डॉक्टरनं सोनोग्राफी काढण्याच्या बहाण्यानं तरुणीला सोनोग्राफी रूममध्ये नेलं. रुममध्ये कुणीही नसल्याचं पाहून आरोपीनं पीडितेला अश्लील स्पर्श करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून साकोली पोलीसांनी डॉ. अग्रवाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार झालेला आहे. साकोली पोलीस डॉक्टरचा शोध घेत आहे.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
July 11, 2025 8:07 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरची वाईट नजर, सोनोग्राफी रुममध्ये नेलं अन् नको तेच केलं, नराधमावर गुन्हा दाखल