बस कंडक्टरचा प्रताप, प्रवाशांच्या पैशांसोबतच केलं मोठं कांड, वाचूनही तुम्हालाही बसेल धक्का
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
विशेष म्हणजे आणखी या प्रकरणात एक धक्कादायक माहिती अशी की, 10 दिवसांपर्यंत परिवहन विभागाने बस वाहकाची कोणताही चौकशी केली नाही. तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क केला नाही.
अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी
लखनऊ : सध्या देशात आयपीएल स्पर्धा सुरू आहे. क्रिकेट रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयपीएलच्या सामन्यासाठी बस वाहकाने प्रवाशांकडून मिळालेले भाड्याचे पैसे सट्टा खेळण्यासाठी वापरले. इतकेच नव्हे तर तब्बल 10 दिवस प्रवाशांच्या पैशांची बॅग घेऊन गायब राहिला.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
विशेष म्हणजे आणखी या प्रकरणात एक धक्कादायक माहिती अशी की, 10 दिवसांपर्यंत परिवहन विभागाने बस वाहकाची कोणताही चौकशी केली नाही. तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क केला नाही. या प्रकरणाची चर्चा माध्यमात झाल्यानंतर विभागाने या बस वाहकाचा करार रद्द केला. दरम्यान, आता परिवहन विभागाकडून बसस्थानक अधीक्षकावर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
आधीही लागले गंभीर आरोप -
लखनऊच्या कैसरबाग बस डेपो याठिकाणी पंकज तिवारी नावाचा एक बस वाहक सेवेत होता. याआधी तो बाराबंकी बसस्थानक याठिकाणी तैनात होता. त्याठिकाणीही पंकज तिवारी हा सरकारी पैशांच्या बॅगेला उशिरा जमा करणे तसेच काही वेळा सरकारी पैशांचा दुरुपयोग करण्यासाठी बदनाम झाला होता. याच कारणामुळे त्याची याठिकाणी बदली करण्यात आली होती. तसेच त्याच्या व्यवहारामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात यावे, असेही विभागाच्या वतीने सुचवण्यात आले होते. मात्र, बस स्थानक प्रमुख एसके गुप्ता यांनी ही बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळेच पुन्हा अशी एक धक्कादायक घटना घडली.
advertisement
65 हजार रुपये असलेली भाड्याच्या पैशांची बॅग घेऊन वाहक जवळपास 10 दिवस गायब राहिला. 10 दिवसांनी येऊन त्याने ही बॅग जमा केली. कैसरबाग ड्यूटी रूमनुसार, 5 एप्रिल रोजी पंकज तिवारी बस घेऊन दिल्लीसाठी रवाना झाला होता. तेथून डेहराडून येथे जाऊन 8 एप्रिल रोजी लखनऊ येथे तो परतायचे होते. या दरम्यान, त्याने प्रवाशांकडून भाडे जमा केले होते. मात्र, परतल्यानंतर त्याने कैसरबाग बस स्थानकात ही पैशांची बॅग जमा केली नाही.
advertisement
या बस वाहकाची चौकशी केली असता त्याने आयपीएल सट्टा खेळत त्यामध्ये हे पैसे वापरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, आता या वाहकाने प्रवाशांकडून किती पैसे वसूल केले होते, किती जमा केले आहेत, ही सर्व चौकशी केली जाणार आहे. या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Lucknow Cantonment,Lucknow,Uttar Pradesh
First Published :
April 24, 2024 10:09 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बस कंडक्टरचा प्रताप, प्रवाशांच्या पैशांसोबतच केलं मोठं कांड, वाचूनही तुम्हालाही बसेल धक्का