Crime News : पती करू शकत नव्हता संतुष्ट, दीरासोबत सुत जुळलं, पत्नीनं केलं भयंकर कांड...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Crime News :अनैतिक संबंधाचा शेवटही गुन्हेगारी आणि त्यानंतर तुरुंगात होत असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नालासोपारामधील अनैतिक संबंधातून पतीची झालेल्या हत्येची घटना ताजी असताना आता अशीच एक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली: नातेसंबंधात येणारे वितुष्ट हे गुन्ह्याच्या मार्गावर घेऊन जात असल्याचे मागील काही घटनांमध्ये दिसून आले आहे. अनैतिक संबंधाचा शेवटही गुन्हेगारी आणि त्यानंतर तुरुंगात होत असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नालासोपारामधील अनैतिक संबंधातून पतीची झालेल्या हत्येची घटना ताजी असताना आता अशीच एक घटना समोर आली आहे.
दिल्लीच्या निहाल विहार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 29 वर्षीय महिला फरजाना खान हिचे लग्न 32 वर्षीय मोहम्मद शाहिद उर्फ इरफानशी झाले होते. लग्न झाले पण जसजसा वेळ गेला तसतसे पती आपल्या पत्नीला शारीरिकदृष्ट्या समाधानी करू शकला नाही. यामुळे संतापलेल्या पत्नीने भयंकर कांड केले.
फरजाना आणि शाहिद उत्तर प्रदेशातील बरेली येथून दिल्लीला आले होते. दोघांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण फरजाना तिच्या लग्नावर खूश नव्हती. तिने सांगितले की शाहिद तिला शारीरिकदृष्ट्या समाधानी करू शकत नव्हता. याशिवाय, शाहिदच्या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे त्यांचे कुटुंब कर्जात बुडाले होते. फरजानाच्या आयुष्यात एका व्यक्तीची एन्ट्री झाली. बरेलीमध्ये राहणाऱ्या तिच्या पतीच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंधात होती.
advertisement
आत्महत्या असल्याचे भासवत हत्या...
रविवारी संध्याकाळी शाहिदच्या भावाने त्याला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शाहिदच्या भावाने पोलिसांना सांगितले की, जुगारातून झालेल्या कर्जाच्या ताणामुळे शाहिदने आत्महत्या केल्याचा दावा फरजानाने केला होता. फरजानाने सांगितले की शाहिदने स्वतःवर चाकूने वार करुन घेतले. मात्र पोलिसांना फरजानाच्या या जबाबावर संशय आला. पोलिसांनी शाहिदचे शरीर पाहिले तर त्यांना त्याच्या शरीरावर तीन घाव दिसून आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शाहीदने स्वत: आपल्यावर वार केल्याचे सांगितले. मात्र, फरजानाचा जबाब आम्हाला काहीसा विचित्र वाटला. आत्महत्या प्रकरणात इतक्या खोलवर जखमा होत नसतात असेही पोलिसांनी सांगितले.
advertisement
पतीच्या चुलत भावाशी संबंध
फरजानाने या हत्येची आधीच कट आखला होता हे स्पष्ट झाले. पोलिसांनी फरजानाला हे पुरावे दाखवले तेव्हा तिने कबूल केले की तिने शाहिदची हत्या केली आहे. फरजाना म्हणाली की ती तिच्या लग्नावर खूप नाखूष होती. शाहिदच्या जुगाराच्या व्यसनामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. याशिवाय, ती शाहिदच्या चुलत भावावर प्रेम करत होती आणि तिच्यासोबत तिचे आयुष्य घालवू इच्छित होती. तिला वाटले की शाहिदपासून सुटका मिळवणे हाच एकमेव मार्ग आहे.
advertisement
फरजानाला मंगळवारी अटक करण्यात आली. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास करत आहेत. या हत्येत फरजानाला दुसऱ्या कोणीतरी मदत केली होती का हे तपासले जात आहे. फरजानाचा प्रियकर, जो शाहिदचा चुलत भाऊ आहे, तो या प्रकरणात सहभागी होता की नाही याचाही पोलीस तपास करत आहेत.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
July 23, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : पती करू शकत नव्हता संतुष्ट, दीरासोबत सुत जुळलं, पत्नीनं केलं भयंकर कांड...


