रिल्समधून प्रसिद्ध पण बापासोबत करायचा भयंकर कृत्य, चिठ्ठीतून उलगडलं बापलेकाच्या मृत्यूचं गूढ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एका व्यक्तीने आपल्या रीलस्टार मुलाची हत्या करून स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला आहे.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या रीलस्टार मुलाची हत्या करून स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला आहे. मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील यांचा गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. यावेळी पोलिसांना मयताच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. याच सुसाईड नोटमधून बापलेकाच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे.
विठ्ठल पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. शिवाय मुलाचा मृतदेह कुठे आहे, याची माहिती त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली. मुलगा दारु पिऊन छळ करतो, याच कारणातून आपण मुलाला संपवलं आहे, असंही त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. रीलस्टार मुलाची हत्या करून वडिलांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील हे मुळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी आहेत. मात्र ते मागील काही वर्षांपासून एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा हितेश हा रीलस्टार होता. तो सोशल मीडियावर विविध विषयांवर रील्स बनवायचा. तो वडिलांपासून वेगळं राहायचा. त्याला दारुचं व्यसन होतं. दारु प्यायल्यानंतर अनेकदा तो आपल्या वडिलांच्या घरी जायचा आणि त्यांना मारहाण करायचा.
advertisement
याच कारणातून वडिलांनी हितेशची हत्या केली. हत्येनंतर हितेशचा मृतदेह भवरखेडा येथील एका नाल्याजवळ पुरला. याची माहिती सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी जाऊन तपास केला असता हितेशचा मृतदेह आढळला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक सुती दोरी देखील आढळली आहे. याच दोरीने विठ्ठल यांनी आपल्या मुलाचा गळा आवळला असावा, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Feb 28, 2025 10:34 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
रिल्समधून प्रसिद्ध पण बापासोबत करायचा भयंकर कृत्य, चिठ्ठीतून उलगडलं बापलेकाच्या मृत्यूचं गूढ










