फेमस वकिलाची आत्महत्या, पोलिसांच्या तपासात धक्कादायक 'लिंक'; माजी क्लायंटकडून पत्नीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अन्...

Last Updated:

एका निष्ठावान वकिलाने आपल्याच माजी क्लायंटच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्याय देणाऱ्या व्यक्तीलाच अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण कायदेशीर क्षेत्रात खळबळ माजली आहे.

News18
News18
कोच्ची : केरळ उच्च न्यायालयाचे वकील आणि माजी वरिष्ठ सरकारी वकील पी. जी. मनु यांनी त्यांच्या एका माजी क्लायंटच्या सततच्या त्रासामुळे आत्महत्या केली असल्याचा दावा या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस पथकाने केला आहे.
मनू यांनी केरळमध्ये राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे (एनआयए) वकील म्हणूनही काम पाहिले होते. ते १३ एप्रिल रोजी कोल्लम जिल्ह्यातील त्यांच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळले होते आणि त्यांचे माजी क्लायंट जॉन्सन जॉय (वय ४०, पिरावोम, एर्नाकुलम) यांना बुधवारी आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी मागणे आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉयला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का? याची ते चौकशी करत आहेत. कारण मनू यांच्यावर काही मित्र आणि काही ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दबाव आणला जात होता.
17 महिन्यांच्या बाळाने कमावले कोट्यवधी;3.3 कोटी रुपयांनी चिमुकल्याची तिजोरी भरली
जॉयला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाच्या एका प्रकरणात अटक केली होती. जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याच्या पत्नीने या प्रकरणात कायदेशीर मदत मागण्यासाठी मनू यांच्याशी संपर्क साधला होता. जामीन मिळाल्यानंतर जॉयने मनू यांच्यावर आपल्या पत्नीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आणि नंतर कथितरित्या वकिलाला सांगितले की जर त्याने माफी मागितली तर हे प्रकरण मिटू शकते, असे पोलिसांनी सांगितले.
advertisement
गेल्या वर्षी, अशाच एका प्रकरणात त्याला त्याच्या महिला क्लायंटचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी वरिष्ठ सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता.
मॅचच्या 48 तास आधी धोनीने डाव टाकला, मुंबईच्या EX खेळाडूला संघात घेतले
लैंगिक शोषणाचे नवीन प्रकरण समोर आल्यास आपली सध्याची जामीन रद्द होऊ शकते या भीतीने मनू त्यांच्या पत्नी आणि बहिणीसोबत जॉयच्या घरी गेले होते. तेथे त्यांना जॉयच्या पत्नीची माफी मागण्यास भाग पाडले गेले, असे पोलिसांनी सांगितले.
advertisement
माफी मागण्याची घटना मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आणि जॉयने मनूला कानाखाली मारली. या व्हिडिओमध्ये आरोपी त्याला वारंवार आत्महत्या करण्यास सांगत असल्याचे दिसत आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
तपास अजूनही सुरू आहे आणि यात सामील असलेल्या इतर व्यक्तींविषयी सध्या माहिती देता येणार नाही. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय होता. परंतु मनू यांच्या मोबाईल फोनच्या तपासणीत त्यांना 'ब्लॅकमेल' केले जात असल्याचे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे, असे तपासाचे नेतृत्व करत असलेले कोल्लम शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. शरीफ यांनी सांगितले.
advertisement
मुलाचे डोके बिघडले, २०० रुपयांसाठी घरात रक्ताचा सडा; आईला मारून टाकले अन्...
मूळचे एर्नाकुलम जिल्ह्यातील पिरावोमचे रहिवासी असलेले मनू यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप होता. संबंधित महिला कायदेशीर मदतीसाठी त्यांच्याकडे आली होती. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. दरम्यान एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये मनू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य कथित अत्याचाराच्या आरोपांसंदर्भात माफी मागण्यासाठी एका अन्य महिलेच्या घरी गेले होते. यानंतर ते गंभीर मानसिक तणावात होते, असे पोलिसांनी सांगितले.
advertisement
जॉयवर मनू माफी मागताना दिसत असलेला व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि तो प्रसारित करण्याचा आरोप आहे.तपासकर्त्यांनी खुलासा केला की, जॉयने प्रकरण मिटवण्यासाठी कथितरित्या आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली होती. परंतु मनू यांनी नकार दिला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
फेमस वकिलाची आत्महत्या, पोलिसांच्या तपासात धक्कादायक 'लिंक'; माजी क्लायंटकडून पत्नीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अन्...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement