अमानुष! नवऱ्याने बायकोला छताला उलटे टांगले, मंगळसूत्र विकायला नकार दिल्याने अत्याचार!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
बरेली, उत्तर प्रदेशमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यसनी नवऱ्याने घरातील सर्व वस्तू विकल्यानंतर पत्नीच्या मंगळसूत्रावर लक्ष ठेवले. पत्नीने नकार दिल्यावर...
या नवऱ्याला वाईट सवयी लागल्या होती. त्याने घरातील सर्व मौल्यवान वस्तू विकून टाकल्या होत्या. जेव्हा त्याची पत्नी विरोध करत होती, तेव्हा तो तिला बेदम मारहाण करत असे. आता घरात विकायला काहीच उरले नव्हते, तेव्हा त्याने पत्नीला तिचे मंगळसूत्र विकायला सांगितले. जेव्हा पत्नीने नकार दिला, तेव्हा पतीने इतका भयंकर अत्याचार केला की, तिला लाथा घातल्या आणि बेदम माराहाण करून छताला उलटे टांगले. ही अमानुष घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे.
पतीने गाठला अनानुषतेचा कळस
पत्नी ओरडत राहिली आणि दयेची भीक मागत राहिली, पण पतीने तिला अजिबात दया दाखवली नाही आणि बराच वेळ तिचे पाय धरून तिला उलटे टांगून ठेवले. उलटे टांगलेले असतानाही, ती महिला आपली मान-मर्यादा वाचवण्यासाठी आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न करत राहिली. पण यानंतरही, ना पतीला, ना तिच्या सासरच्या मंडळींना तिला वाचवण्याची जराही काळजी वाटली नाही. महिलेच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत आले आणि जसे पतीने पत्नीला छतावरून खाली फेकले, तसे शेजारी देवदूत बनून महिलेला अत्याचारापासून वाचवले. आता महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि चार सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
advertisement
सविस्तर घटना अशी की...
ही धक्कादायक घटना आंवला पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे निर्दयी पतीला वाईट सवयी इतक्या जडल्या की त्याने आपले घर उद्ध्वस्त केले. त्याने घरातील सर्व मौल्यवान वस्तू विकायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणारे पैसे आपल्या वाईट सवयींमध्ये गुंतवले. आता घरात काहीच शिल्लक नसल्यावर त्याची नजर पत्नीच्या मंगळसूत्रावर गेली. दोन दिवसांपूर्वी, जेव्हा त्याने पत्नीला मंगळसूत्र विकायला किंवा गहाण ठेवायला सांगितले, तेव्हा पत्नीने नकार दिला.
advertisement
मुलं आईला मिठी मारून वाचवत होते
पत्नीच्या या नाकारण्यावर पती इतका भडकला की त्याने प्रथम पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिचे पाय बांधून तिला छताला उलटे टांगले. बराच वेळ तिला उलटे टांगल्यानंतर, पत्नीच्या किंकाळ्या ऐकून शेजारी आले आणि जसा पतीने पत्नीला छतावरून खाली फेकले, तसे शेजारी देवदूत बनून महिलेला वाचवण्यासाठी पुढे आले. इतकेच नव्हे, जेव्हा महिला जमिनीवर पडली होती, तेव्हा तिच्या निष्पाप मुलांनीही आपल्या आईला मिठी मारून तिला उचलण्याचा प्रयत्न केला. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर, महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि चार सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
advertisement
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि आता लवकरच सर्व आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल. सध्या, पतीने क्रूरतेची परिसीमा गाठली आहे, माणुसकीला काळिमा फासला आहे.
हे ही वाचा : मध्यरात्री तरूण करत होता अश्लील काॅल, महिलेने लाजेखातर सहन केला त्रास, पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं...
advertisement
हे ही वाचा : धक्कादायक! महिला अन् प्रियकर झोपले होते एकत्र, अचानक झाली पतीची एंट्री आणि पुढे जे झालं...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2025 8:17 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अमानुष! नवऱ्याने बायकोला छताला उलटे टांगले, मंगळसूत्र विकायला नकार दिल्याने अत्याचार!