"बायको पाहिजे तर तीन लाख रुपये दे", सासुरवाडीत जावयाला बेदम चोपला; सासू- सासऱ्यांचा छळ ऐकून पोलीस हादरले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Kolhapur Crime News: बायकोला घेऊन जायचे असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकीच दिली.
कोल्हापूर : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजे असताना कोल्हापुरातील एक अजब प्रकार समोर आले आहे. बायकोला माहेरी घेऊन जायचे असेल तर माहेरच्यांनी चक्क जावयाकडे सोन्याची आणि पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी पती लखन बेनाडे याने शहापुरी पोलिस स्थानकता फिर्याद केली असून त्यानुसार पत्नीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लखन बेनाडे यांचा ऑक्टोबर 2024 साली लक्ष्मी हिच्याशी विवाह झाला होता. मात्र काही दिवसाच दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. दररोज होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. दरम्यान माहेरी जाताना एक तोळ्याची चेन आणि घरातील तीन मोबाईल घेऊन गेली. बरेच दिवस पत्नी न आल्याने अखेर पती राजारामपुरी येथे पत्नीच्या माहेरी गेला. मात्र माहेरच्यांनी रस्त्यातच जावयाला थांबवत मारहाण केली.तसेच बायकोला घेऊन जायचे असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकीच दिली. अखेर पीडित पतीने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार गेली.
advertisement
परिसरात मोठी खळबळ
पत्नी लक्ष्मी लखन बेनाडे हिच्यासह गोपाल विधामनी, काजल गोपाल विधामनी विशाल बाबूराव गस्ते, विश्वजित विशाल गस्ते, आकाश गस्ते संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सत्य बाहेर येईल. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दहा लाख रुपये दे म्हणत पत्नीचा छळ
advertisement
विवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच 10 लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीमध्ये घडला आहे. तुझ्या आई वडिलांनी मला लग्नात काहीच दिले नाही, त्यामुळे दहा लाख रुपये दे म्हणत मारहाण करुन शारिरीक, मानसिक छळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर दुसरीकडे पैशांसाठी जावयाचा छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jun 16, 2025 9:09 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
"बायको पाहिजे तर तीन लाख रुपये दे", सासुरवाडीत जावयाला बेदम चोपला; सासू- सासऱ्यांचा छळ ऐकून पोलीस हादरले










