कल्याण: बदनाम गल्लीची लेडी डॉन, फिजा इराणीला बेड्या, अनेकांच्या जीवाशी करत होती खेळ

Last Updated:

Crime News Kalyan: कल्याण डीसीपी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीमधून इराणी लेडी डॉनला बेड्या ठोकल्या आहेत.

News18
News18
प्रदीप भनगे, प्रतिनिधी कल्याण: कल्याण डीसीपी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीमधून इराणी लेडी डॉनला बेड्या ठोकल्या आहेत. फिजा इराणी असं या लेडी डॉनचं नाव असून तिच्या जवळून पोलिसांनी 1 लाख 16 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. फिजा इराणी विरोधात याआधी देखील अमली पदार्थ तस्करीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे. कल्याण डीसीपी स्कॉडला खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एम.डी ड्रग्ज विक्री केले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी स्कॉडच्या पथकाने अटाळी परिसरात सापळा रचला.
advertisement
या ठिकाणी एक महिला स्कूटी घेऊन उभी होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तत्काळ तिला हटकले. तिची झडती घेतली असता तिच्याजवळ एक लाख 16 हजार रुपये किमतीचे एम. डी. ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या महिलेला ताब्यात घेतलं. फिजा इराणी असं या महिलेचे नाव आहे.
फिजा इराणी ही आंबिवली जवळील कुप्रसिद्ध असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहते. तिच्या विरोधात खडकपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कल्याण: बदनाम गल्लीची लेडी डॉन, फिजा इराणीला बेड्या, अनेकांच्या जीवाशी करत होती खेळ
Next Article
advertisement
BMC Election:  महायुतीच्या बैठकीआधी मोठी घडामोड, भाजप 150 जागांवर ठाम, शिंदे गटाला किती जागांची ऑफर?
महायुतीच्या बैठकीआधी मोठी घडामोड, भाजप 150 जागांवर ठाम, शिंदे गटाला किती जागांची
  • महायुतीच्या बैठकीआधी मोठी घडामोड, भाजप 150 जागांवर ठाम, शिंदे गटाला किती जागांची

  • महायुतीच्या बैठकीआधी मोठी घडामोड, भाजप 150 जागांवर ठाम, शिंदे गटाला किती जागांची

  • महायुतीच्या बैठकीआधी मोठी घडामोड, भाजप 150 जागांवर ठाम, शिंदे गटाला किती जागांची

View All
advertisement