VIDEO: लग्नाला जाताना भररस्त्यात उडाला भडका, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस जळून खाक

Last Updated:

VIRAL VIDEO: धुळे जिल्ह्यातील धुळे-दोंडाई रस्त्यावरील डांगुर्णे गावाजवळ एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.

News18
News18
दीपक बोरसे, प्रतिनिधी धुळे: धुळे जिल्ह्यातील धुळे-दोंडाई रस्त्यावरील डांगुर्णे गावाजवळ एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. संबंधित बसमधून लग्नाचं वऱ्हाड जात होतं. मात्र लग्नाला पोहोचण्याआधी वऱ्हाडाला रस्त्याचं विघ्न आलं आहे. लग्नास्थळी जात असताना वाटेतच अचानक आगीचा भडका उडून संबंधित बस जळून खाक झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस लग्नाचं वऱ्हाड घेऊन धुळ्याहून शहादाकडे जात होतं. दरम्यान, या खाजगी लक्झरी बसला डांगुर्णे गावाजवळ अचानक आग लागली. बसला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस थांबवली आणि बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं. यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं आणि संपूर्ण बस आगीच्या कचाट्यात सापडली.
advertisement
ही आग इतकी भयंकर होती, की वऱ्हाड्यांना बसमधील आपलं सामान काढायलाही वेळ मिळाला नाही. वऱ्हाड्यांचं सर्व सामान बससह जळून खाक झालं आहे. या भीषण आगीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आता ही आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती समजली नसली तरी शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
एक लक्झरी बसला आग लागल्याची माहिती कळताच धुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. पण भररस्त्यात अशाप्रकारे बसला आग लागल्याने रस्त्यावर बराच वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. आगीचे भडके उडत असल्याने अनेक वाहनं बसपासून काही अंतरावर थांबली होती. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
VIDEO: लग्नाला जाताना भररस्त्यात उडाला भडका, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस जळून खाक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement