अहमदनगर हादरलं! आईने प्रियकराच्या मदतीनं पोटच्या 2 लेकरांना संपवलं, शेततळ्यात बुडवून मारलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आईनेच प्रेमात अडसर ठरणा-या आपल्या मुलांना शेततळ्यात बुडवून मारल्याचं वास्तव समोर आलं आहे
अहमदनगर (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : हत्येचं एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका आईनेच आपल्या मुलांचा जीव घेतला. दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एप्रिल महिन्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय 12 वर्ष) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय 8 वर्ष) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वर्षभराआधी या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती.
advertisement
मुलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलीस काहीही कारवाई करत नसल्याने काही दिवसांपूर्वी पुणे महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यानंतर पोलीसांनी सखोल तपास केला. यावेळी मुलांची आई कविता सारंगधर पावसे हिने तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे याच्या मदतीने हे सगळं केल्याचं समोर आलं. आईनेच प्रेमात अडसर ठरणा-या आपल्या मुलांना शेततळ्यात बुडवून मारल्याचं वास्तव समोर आलं आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना गजाआड केलं आहे.
advertisement
नागपुरात आढळला जोडप्याचा मृतदेह -
view commentsनागपुरमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सेमिनरी हिल्स परिसरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एअर फोर्समध्ये नोकरीवर असलेला कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचा हा मृतदेह आहे. दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक गजभिये आणि विद्या गजभिये अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत. प्राथमिक तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार, पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2024 1:25 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अहमदनगर हादरलं! आईने प्रियकराच्या मदतीनं पोटच्या 2 लेकरांना संपवलं, शेततळ्यात बुडवून मारलं


