नागपुरात आढळला एअर फोर्समधील कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृतदेह; घटनेनं परिसरात खळबळ
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
नागपूर : नागपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सेमिनरी हिल्स परिसरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एअर फोर्समध्ये नोकरीवर असलेला कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचा हा मृतदेह आहे. दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक गजभिये आणि विद्या गजभिये अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत.
प्राथमिक तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार, पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक हे एअरफोर्समध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी विद्या या गृहिणी होत्या. त्या गेल्या तीन वर्षांपासून अर्धांगवायूने ग्रस्त होत्या.
advertisement
मुलगा आणि मुलगी घराबाहेर गेले असताना या दाम्प्त्यानी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. गिट्टीखदान पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही .
नागपुरात पोलिसाची आत्महत्या
view commentsकाही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या नागपुरातील आणखी एका घटनेत महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने धक्कादायक पाऊल उचललं. हे पोलीस कॉन्स्टेबल लग्नासाठी एका गावात गेले होते. तिथे काही जणांनी त्यांना नातेवाईक महिलेसमोरच मारहाण केली. यामुळे नैराश्यात जाऊन सुनील सुखदेव सार्वे (वय 56) यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली. पोलीस कॉन्स्टेबलच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून यातूनच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2024 7:53 AM IST


