लग्नाला गेल्यावर महिलेसमोरच झाली मारहाण; नैराश्यात नागपुरातील पोलिसाने आयुष्यच संपवलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पोलीस कॉन्स्टेबलच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून यातूनच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
नागपूर : महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. हे पोलीस कॉन्स्टेबल लग्नासाठी एका गावात गेले होते. तिथे काही जणांनी त्यांना नातेवाईक महिलेसमोरच मारहाण केली. यामुळे नैराश्यात जाऊन सुनील सुखदेव सार्वे (वय 56) यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली.
पोलीस कॉन्स्टेबलच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून यातूनच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. यानंतर आरोपींविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत कॉन्स्टेबल हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील गुंथारा येथील होते.
सुनील सुखदेव सार्वे हे 26 मे रोजी पत्नी आणि बहिणीसह एका लग्नासाठी गुंथारा येथे गेले होते. तिथेच त्यांना काही लोकांनी मारहाण केली. यानंतर ते नागपुरला परत येऊन ड्यूटीवरही गेले होते. मात्र, तिथेच त्यांनी विष प्राशन केलं. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
खिशातील चिठ्ठीमध्ये त्यांनी गावामध्ये आपल्याला मारहाण केलेल्या लोकांची नावंही लिहिली होती. यात भोजराज सार्वे, शेषराव सार्वे, निलेश सार्वे, धनराज सार्वे आणि भूष सार्वे यांनी एका नातेवाईक महिलेसमोरच मारहाण केली. याच नैराश्यात आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी लिहिलं, यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2024 9:38 AM IST
मराठी बातम्या/नागपूर/
लग्नाला गेल्यावर महिलेसमोरच झाली मारहाण; नैराश्यात नागपुरातील पोलिसाने आयुष्यच संपवलं


