Nashik Crime News : वेगवेगळ्या जिल्ह्यातील कुख्यात, दिवसा भाजी विक्रेते, सेल्समन अन् रात्री करायचे भयंकर कांड
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
वेगवेगळ्या जिल्ह्यातील कुख्यात, दिवसा भाजी विक्रेते, सेल्समन अन् रात्री करायचे भयंकर कांड
नाशिक : वेगवेगळ्या जिल्ह्यातील कुख्यात गुंडांनी एकत्र येत मोठं कांड केलं असल्याचे समोर आले आहे. त्यांनी केलेल्या कांडमुळे पोलिसही चक्रावले आहेत. मागील काही दिवस या गुंडांची टोळी भाजी विक्रेते, सेल्समन म्हणून वावरायचे. मात्र, रात्र होताच भयंकर कांड करायचे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दरोडेखोरांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. भाजीविक्रेते किंवा सेल्समन बनून ही टोळी दिवसा गावात फेरफटका मारून रेकी करत असे. रात्रीच्या वेळी घरफोडी व दरोडे घालत नागरिकांना बेदम मारहाण करायचे. एका दिवसात 5 ते 6 घटनांमुळे परिसरातील गावकरी दहशतीत होते. अनेक गावांमध्ये नागरिक स्वतः गस्त घालू लागले होते, तर पोलिसांकडूनही सतत पेट्रोलिंग सुरू होते.
advertisement
हा वाढता दहशतवाद रोखण्याचे आव्हान नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत या टोळीतील तीन स्थानिक आरोपींना जेरबंद केले असून, बाहेर जिल्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
जेरबंद झालेले आरोपी
स्थानिक गुन्हेगार विशाल बनसोडे, दिलीप चव्हाण, राहुल चव्हाण यांनी रायगड, संभाजीनगर, जळगाव आणि मालेगाव येथील अट्टल गुन्हेगार अजय चव्हाण, आकाश चव्हाण, सोमनाथ चव्हाण, रोहिदास चव्हाण यांच्या मदतीने नाशिकच्या ग्रामीण भागात दरोड्यांची मालिका सुरू केली होती.
advertisement
पूर्वइतिहासही गुन्हेगारीने भरलेला
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, या आरोपींनी यापूर्वी मुंबई, सातारा, रायगड, पुणे, बुलढाणा, सोलापूर, ठाणे जिल्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा, दुखापत आणि अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. पोलिसांचा दावा आहे की या कारवाईमुळे निफाड-सिन्नर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, उर्वरित आरोपी लवकरच गजाआड होतील.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 14, 2025 3:25 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nashik Crime News : वेगवेगळ्या जिल्ह्यातील कुख्यात, दिवसा भाजी विक्रेते, सेल्समन अन् रात्री करायचे भयंकर कांड