व्हॉट्सॲपर मेसेज आला अन् बँक खातं रिकामं, सावधान! तुमच्यासोबतही असं होऊ शकतं, काय कराल?

Last Updated:

Cyber Fraud: राज्यभरात सध्या ई-चलानच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेकांचे बँक खाते काही मिनिटांतच साफ झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

व्हॉट्सॲवर मेसेज आला अन् बँक खातं रिकामं, सावधान! तुमच्यासोबतही असं होऊ शकतं, काय कराल?
व्हॉट्सॲवर मेसेज आला अन् बँक खातं रिकामं, सावधान! तुमच्यासोबतही असं होऊ शकतं, काय कराल?
पुणे : तुमच्या वाहनावर दंड (ई-चलान) लागला आहे, तात्काळ भरा, असा मेसेज किंवा व्हॉट्सॲप लिंक मिळाल्यानंतर अनेक नागरिक घाबरून त्यावर क्लिक करत आहेत. मात्र, ही लिंक अधिकृत नसून सायबर चोरांकडून पाठवली जात असल्याचे समोर आले आहे. पुण्यासह राज्यभरात सध्या ई-चलानच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेकांचे बँक खाते काही मिनिटांतच साफ झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे ‘तुमच्या वाहनाचे चलान बाकी आहे’, ‘ई-चलान डिटेल पाहण्यासाठी अॅप डाउनलोड करा’ अशा स्वरूपाचे मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजसोबत एपीके फाइल, पीडीएफ किंवा झीप फाइलची लिंक दिली जाते. संबंधित लिंकवर क्लिक करताच ती फाइल आपोआप मोबाइलमध्ये इन्स्टॉल होते. ही फाइल अधिकृत अॅप नसून, एक प्रकारचे धोकादायक स्पायवेअर असल्याचे सायबर तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
एकदा हे ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाले की, ते मोबाइलवरील ओटीपी, बँकिंग ॲप्स, पासवर्ड, मेसेजेस तसेच कॉन्टॅक्ट लिस्टवर पूर्ण नियंत्रण मिळवते. त्यानंतर सायबर चोर काही वेळातच पीडिताच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढतात. अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत मोठे आर्थिक नुकसान झालेले असते.
advertisement
पोलीस आणि सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक पोलिसांचे अधिकृत ई-चलान केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत ॲपवरच उपलब्ध असते. अनोळखी नंबरवरून आलेले चलानचे मेसेज, लिंक किंवा फाइल्स उघडणे धोकादायक ठरू शकते.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
अनोळखी नंबरवरून आलेले चलानचे मेसेज किंवा लिंक क्लिक करू नका.
एपीके, पीडीएफ किंवा झीप फाइल्स डाउनलोड अथवा ओपन करू नका.
advertisement
गुगल प्ले स्टोअरशिवाय कोणतेही ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू नका.
संशयास्पद ॲप आढळल्यास तात्काळ डिलीट करा.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या काळात नागरिकांनी अधिक जागरूक राहणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
व्हॉट्सॲपर मेसेज आला अन् बँक खातं रिकामं, सावधान! तुमच्यासोबतही असं होऊ शकतं, काय कराल?
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement