Nalasopara Crime : 'डॉन को पकडना मुश्किल..' बलात्कारातील आरोपीचा चक्क पीआयला कॉल, पोलिसांनी काही तासांत उतरवला माज

Last Updated:

Nalasopara Crime : बलात्कारातील आरोपीने चक्क वरिष्ठ पोलीस निरिक्षकाला फोन करुन चित्रपटातील डायलॉग ऐकवल्याने खळबळ उडाली होती.

बलात्कारातील आरोपीचा चक्क पीआयला कॉल, पोलिसांनी काही तासांत उतरवला माज
बलात्कारातील आरोपीचा चक्क पीआयला कॉल, पोलिसांनी काही तासांत उतरवला माज
नालासोपारा, 4 ऑक्टोबर (विजय देसाई, प्रतिनिधी) : अभिनेता अमिताभ बच्चन यांचा डॉन चित्रपट सर्वांनाच माहीत आहे. या चित्रपटातील "डॉन को पकडना मुश्किलही नही, नामुनकीन है" हा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. हाच संवाद बलात्काराच्या आरोपीने चक्क तुळींज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला व्हाटसअप कॉल करून सुनावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याच्या एक महिन्यानंतर 43 वर्षीय आरोपी नराधमाला भाईंदरच्या उत्तन परिसरातून अटक केली आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
16 वर्षीय पीडित मुलगी घटनेच्या दिवशी कामावरून लोकल ट्रेनने घरी जात होती. त्यावेळी तिच्या मित्राने फोन करून वाढदिवस असल्याचे सांगून तू येऊन केक काप असे बोलला. पीडित तरुणी नायगाव रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर तिचा मित्र आला आणि तिला मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. सर्व मित्र मैत्रिणींनी मिळून केक कापला आणि एकत्र जेवण केले. सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. यावेळी तिच्या मित्राने त्याच्या मित्राला त्याच्या कारमधून नालासोपारा येथे सोडण्यास सांगितले. आरोपीने पीडितेला कारमध्ये लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेत कारमध्येच जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेने कसा तरी तेथून पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने दुसऱ्या दिवशी घरी कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तुळींज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तपास सुरू केला.
advertisement
ही अल्पवयीन मुलगी तिच्या मूळ गावी राजस्थान येथे असल्याची खबर मिळल्यावर राजस्थान मधून मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन आले. ती घरातून का पळून गेली याची चौकशी सुरू केली. मुलीने घडलेली हकीकत सांगितल्यावर ते ऐकून पोलिसांना धक्का बसला. आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवत असताना तिने ऑटोमॅटिक ऑडिओ रेकॉर्डिंग केले होते. याच ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी नेहमी आपला मोबाईल बंद ठेवत होता. गरज पडेल तेव्हा तो इतरांशी इंटरनेट कॉलिंगद्वारे संपर्क करायचा. तो गेल्या एक महिन्यापासून पोलिसांशी लपाछपी खेळत होता. त्याच्याकडे राहण्यासाठी एकही जागा नसल्याने तो वारंवार जागा बदलत होता. पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना व्हाट्सअप कॉल करून डॉन सिनेमाचा डायलॉग ऐकवला होता.
advertisement
पण एकदा त्याने पत्नीशी संपर्क साधला. तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या मदतीने माहिती काढून उत्तन परिसरातून अटक केली आहे. धनंजय दुबे उर्फ जय दुबे (वय 43) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Nalasopara Crime : 'डॉन को पकडना मुश्किल..' बलात्कारातील आरोपीचा चक्क पीआयला कॉल, पोलिसांनी काही तासांत उतरवला माज
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement