Pandharpur News : शतपावलीसाठी गेले अन् घात झाला; पोलीस उपनिरीक्षकाच्या मृत्यूने पंढरपूर हादरलं!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Pandharpur News : शतपावलीसाठी बाहेर पडले पोलीस उपनिरीक्षक, दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी संपवलं
वीरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी पंढरपूर, 3 ऑगस्ट : पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर इथे घडली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे वय 42 यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सांगोला तालुक्यातील वासूद परिसरात घडली. रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी सूरज हे आपल्या घरापासून थोडं दूर गेले. केदारवाडी रस्त्यावर ते शतपावली करत होते.
याच दरम्यान तिथे दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांचं मृत्यू झाला आहे. शतपावली करुन बराचवेळ उलटला तरी सूरज हे घरी आले नाहीत. त्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली. कुटुंबियांनी शोध घेतला असता लासूद केदारवाडीजवळ पोलीस उपनिरीक्षक केदार यांचं मृतदेह आढळून आला आहे.
advertisement
कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सूरज यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Aug 03, 2023 11:24 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Pandharpur News : शतपावलीसाठी गेले अन् घात झाला; पोलीस उपनिरीक्षकाच्या मृत्यूने पंढरपूर हादरलं!









