"हा घे नंबर अन् रात्री काॅल कर", प्राध्यापकाचा मोठा कांड, एक नव्हे, तर तब्बल 12 विद्यार्थिनींचा...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
रूडकीच्या शासकीय डिग्री कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक डॉ. अब्दुल अलीम अन्सारी यांनी वायवा परीक्षेवेळी 12 विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार...
एका शासकीय पदवी महाविद्यालयात 55 वर्षीय सहाय्यक प्राध्यापक डॉ. अब्दुल अलीम अंसारी यांना 12 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बीएससीच्या प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान तोंडी परीक्षा (व्हायवा) सुरू असताना हा प्रकार घडला. एका पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, अंसारी यांनी गुरुवारी दुपारी बंद खोलीत विद्यार्थिनींना गैर पद्धतीने स्पर्श केला.
हातावर नंबर लिहिला अन् फोन करण्यास सांगितलं
ही धक्कादायक घटना उत्तराखंडमधील रुडकी येथे घडली. गंगानगर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक आर. के. सकलानी यांनी सांगितले की, अंसारी यांनी एका विद्यार्थिनीच्या हातावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहिला आणि तिला रात्री घरी बोलण्यास सांगितले. बाहेर आल्यावर एका पीडितेने आपला अनुभव सांगितल्यावर इतर विद्यार्थिनींनीही प्राध्यापकाने त्यांना गैर पद्धतीने स्पर्श केल्याचं उघड केलं.
advertisement
...म्हणे स्पर्श केला, पण वाईट हेतू नव्हता
तक्रारीनुसार, जेव्हा विद्यार्थिनींनी विरोध केला, तेव्हा अंसारी यांनी त्यांचे मार्क कापण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी प्राध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी केली. आरोपी प्राध्यापक भगवानपूरजवळील दुसऱ्या महाविद्यालयातही शिकवतो. विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर, कॉलेज प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी एका पीडितेच्या तक्रारीवरून अंसारी यांना अटक केली. चौकशीदरम्यान, अंसारी यांनी मुलींना स्पर्श केल्याचं कबूल केलं, पण त्यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता असा दावा केला.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, अंसारी यांनी विद्यार्थिनीच्या हातावर मोबाईल नंबर का लिहिला, याचं समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान, कॉलेज अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंसारी यांनी बुधवारी आणि गुरुवारी घेतलेल्या दोन्ही प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : गावाला भरली धडकी! ज्या विहिरीने 8 जणांचा घेतला बळी, गावकरी त्याचीच करताहेत पूजा, पण का?
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
"हा घे नंबर अन् रात्री काॅल कर", प्राध्यापकाचा मोठा कांड, एक नव्हे, तर तब्बल 12 विद्यार्थिनींचा...