तुरुंगातून सुटण्यासाठी वाल्मीकची मोठी फिल्डींग, आज महत्त्वाची सुनावणी, उज्ज्वल निकमही राहणार हजर

Last Updated:

Crime in Beed: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेली सुदर्शन घुले टोळीला अटक केली आहे. या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मात्र वाल्मीक कराडने या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी मोठी फिल्डींग लावली आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराडकडून डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल केलं आहे. यावर आज बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे उपस्थित राहणार असून आरोपी वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज अॅप्लीकेशन वर युक्तिवाद होऊ शकतो. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे बीडमध्ये दाखल झाले आहेत.
advertisement
आज मंगळवारी सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. वाल्मीक कराड यांनी दोषमुक्ती संदर्भात केलेल्या अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाल्मीक कराडची डिस्चार्ज याचिका कोर्टाकडून मान्य झाली, तर वाल्मीकची संतोष देशमुख प्रकरणातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून वाल्मीक कराडचा दोषमुक्त होण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्याने मोठी फिल्डींग लावली आहे. पण कोर्ट यावर काय निर्णय घेणार? त्यावर वाल्मीक कराडचं भवितव्य ठरणार आहे.
advertisement
खरं तर, संतोष देशमुख प्रकरणातून सुटका होण्यासाठी आरोपी विष्णू चाटे यानं देखील डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल केलं होतं. पण मागील सुनावणीत त्याने आपली याचिका मागे घेतली. याचिका मागे घेत असताना पुन्हा अशाप्रकारची याचिका दाखल करण्याचा अधिकार अबाधित ठेवून त्याने ही याचिका मागे घेतली. तर वाल्मीक कराडने मात्र आपली याचिका कायम ठेवली होती. आता आज यावर सुनावणी होणार आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
तुरुंगातून सुटण्यासाठी वाल्मीकची मोठी फिल्डींग, आज महत्त्वाची सुनावणी, उज्ज्वल निकमही राहणार हजर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement