संभाजीनगरात संतोष देशमुख पॅटर्न, तरुणाला अर्धनग्न करून मारहाण, रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ येथे एका 28 वर्षीय तरुणाला अज्ञातांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण केली. यावेळी आरोपींनी देशमुखांच्या अंगावरचे कपडे काढत त्यांना लाकडी काठी आणि रॉडने मारहाण केली. या मारहाणीत देशमुखांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. ही घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख पॅटर्नने एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ येथे एका 28 वर्षीय तरुणाला अज्ञातांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे मयत तरुण हा अर्ध नग्न अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अर्जुन रतन प्रधान वय 28 मृत तरुणाचं नाव आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह एकलहेरा रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याला कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून बेदम मारहाण करत त्याचा निर्घृण खून केला असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
advertisement
एका २८ वर्षीय तरुणाची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कुणी केली? कशासाठी केली? याची कसलीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलीस सर्व बाजुने तपास करत आहेत. मयत तरुणाचं कुणासोबत पूर्व वैमनस्य होतं का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 12, 2025 2:17 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
संभाजीनगरात संतोष देशमुख पॅटर्न, तरुणाला अर्धनग्न करून मारहाण, रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह


