'पतीने घातक औषधं दिली, मारहाण केली अन्...'; जंगलात आढळलेल्या अमेरिकन महिलेचे खळबळजनक आरोप
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
ती महिला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले
सिंधुदूर्ग (भरत केसरकर) : सावंतवाडीच्या रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात दोन दिवसांपूर्वी एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल करत पुढील तपास सुरू केला होता. ती महिला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले. पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसंच याठिकाणी जंगलात बांधून ठेवल्याची माहिती तिने दिली आहे.
अन्न न मिळाल्याने ती अशक्त बनली होती. तपासासाठी तामिळनाडू, गोवा, मुंबईत पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. कायी कुमार एस नावाची ही महिला साखळीने पायाला बांधलेल्या अवस्थेत रोणापाल-सोनुर्ले येथील घनदाट जंगलात शनिवारी आढळली होती. गुराख्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तिला आता उपचारासाठी गोव्यात हलवलं आलं आहे . सावंतवाडीतील मडुरा रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येणार आहे. योगाभ्यासासाठी भारतात ती आली होती.
advertisement
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून ती अमेरिकन महिला असल्याने सिंधुदुर्ग पोलिसांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला आहे. त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
बांदा पोलीस ठाणे येथे पती सतीश याच्यावर सोमवारी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे करत आहेत. रोणापाल येथील गुराखी पांडुरंग गावकर यांना ही महिला जंगलात पहिल्यांदा दिसली होती. मंगळवारी दिवसभर बांदा पोलीस ठाण्याचे विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने रोणापाल येथील जंगलात जात तपास केला. ती महिला कुठून आली? तिला इथे कसं आणण्यात आलं?कसं बांधण्यात आलं? याची सखोल माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2024 9:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'पतीने घातक औषधं दिली, मारहाण केली अन्...'; जंगलात आढळलेल्या अमेरिकन महिलेचे खळबळजनक आरोप


