Urvashi Rautela सह माजी महिला खासदाराला ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?

Last Updated:

Urvashi Rautela : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती सध्या एका मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती सध्या एका मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीने या दोघींनाही समन्स पाठवलं आहे आणि त्यांना चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, या दोघींचा नेमका काय संबंध आहे?

1xBet ॲप प्रकरणाचा तपास!

मीडिया रिपोर्टनुसार, ईडी ‘१एक्सबेट’ या ॲपवरील सट्टेबाजीच्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि याच संदर्भात या दोन अभिनेत्रींना समन्स पाठवण्यात आलं आहे. मिमी चक्रवर्तीला १५ सप्टेंबर, तर उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. मात्र, या प्रकरणावर दोन्ही अभिनेत्रींनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement

याआधी ‘या’ क्रिकेटपटूंनाही बोलावलं होतं!

याआधीही ‘ईडी’ने याच प्रकरणी काही प्रसिद्ध व्यक्तींना चौकशीसाठी बोलावलं होतं. ४ सप्टेंबर रोजी माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांना ईडीने बोलावून त्यांची चौकशी केली होती. तर त्यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी सुरेश रैना यांनाही चौकशीसाठी हजर राहावं लागलं होतं.
उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या ग्लॅमरस लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती आफताब शिवदासानीसोबत ‘कसूर २’ आणि सनी देओलच्या ‘जाट’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, माजी खासदार असलेली मिमी चक्रवर्ती लवकरच ‘रक्तबीज २’ या बंगाली चित्रपटात काम करताना दिसेल.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Urvashi Rautela सह माजी महिला खासदाराला ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement