advertisement

Salman Khan News: 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर पाहून ट्रोल करणाऱ्यांना सलमान खानचं प्रत्युत्तर; म्हणाला, 'कर्नल हूं...'

Last Updated:

अभिनेता सलमान खान सध्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. टीझरमुळे झालेल्या ट्रोलिंगला अभिनेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्याच्या उत्तरने सर्वांचीच बोलती बंद केली आहे.

News18
News18
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मे आणि जून 2020 मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यामध्ये झालेली चकमक प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. सलमान खानच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. टीझरमधील एक्सप्रेशन्समुळे सलमान खान तुफान ट्रोल झाला होता. वॉर सीन्स दरम्यान अभिनेत्याने काही ठिकाणी रोमँटिक एक्सप्रेशन्स दिल्यामुळे सलमान ट्रोल झाला होता. आता या प्रकरणावर अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खानने आयएसपीएल सीझन 3 च्या इव्हेंटसाठी उपस्थिती लावली होती. या इव्हेंटदरम्यान अभिनेत्याने मोहम्मद कैफ यांनी सलमानसोबत मनमुराद गप्पा मारल्या. त्यांनी अभिनेत्याला चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करायला लावला होता. टीझरमध्ये सलमानच्या हातात बॅट असल्याचा एक सीन आहे, तो रिक्रिएट करायला सांगितला होता. या दरम्यान अभिनेता म्हणाला की, " काही जणांना असं वाटतं की, माझा हा रोमँटिक लूक आहे. पण भावा मी कर्नल आहे, कर्नलचा लूक कोणालाही समजून येतो. आपल्या सहकाऱ्यांना आणि आपल्या टीमला कसं प्रोत्साहित करायचं, आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने मी प्रेक्षकांनाही प्रोत्साहित करू शकतो. त्या लूकचा दुसरा अर्थ नाही. प्रेक्षकांच्या आशिर्वादाने आतापर्यंत जसं चालत आलंय त्याचपद्धतीने पुढेही चालत राहिल."
advertisement
"उगाच कोणतेही प्रेक्षकांसमोर एक्सप्रेशन्स आणून फायदा नाही. त्यामुळे आधीपासून जसे चालत आले आहे, तसेच चालत राहिल." असं मुलाखतीच्या शेवटच्या भागात सलमान म्हणाला आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून हा चित्रपट येत्या 17 एप्रिल 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबत मुख्य भूमिकेत चित्रांगदा सिंग सुद्धा दिसणार आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि उर्वरित टीम चित्रपटातले सीन्स पूर्ण करत आहेत. काही नवीन दृश्ये देखील जोडली जात आहेत. चित्रपटाविषयी पीटीआयमध्ये बोलताना सलमान खान म्हणाला की, हा चित्रपट शारीरिकदृष्ट्या फार कठीण होता. दिवसेंदिवस काम कठीण होत गेले. मला प्रशिक्षणासाठी बराच वेळ द्यावा लागला. पूर्वी मी एक किंवा दोन आठवड्यात प्रशिक्षण घ्यायचो. पण आता तसं राहिलं नाही. या चित्रपटासाठी मी विशेष ट्रेनिंग घेत चित्रपटासाठी विशेष काम केलं.", असं अभिनेत्याने सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan News: 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर पाहून ट्रोल करणाऱ्यांना सलमान खानचं प्रत्युत्तर; म्हणाला, 'कर्नल हूं...'
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement