धनंजय मुंडे झाले भावुक, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पोहोचले, पहिली प्रतिक्रिया VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
राजभवनामध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्याला धनंजय मुंडे पोहोचले. पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे भावुक झाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सगळेच नेते उपस्थितीत होते. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मागील २ दिवसांपासून सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत धनंजय मुंडे हजर होते.
राजभवनामध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्याला धनंजय मुंडे पोहोचले. पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे भावुक झाले. "अजितदादांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं आहे. ते काम आता पुढे न्यायचं आहे, त्यासाठी ही प्रक्रिया पुढे चालली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली.
advertisement
धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये मुंडे म्हणाले की, '2012 पासून देवगिरी या स्व. अजितदादांच्या मुंबईतील निवासस्थानी जातो, आज पहिल्यांदाच स्व. अजितदादा नसताना जावे लागले. दादांना कधी कोणी पाया पडलेलं आवडत नसायचं, पण देवगिरीवर तो अधिकार मला होता. दुर्दैव आमचं की आज दादांच्या फोटोला नतमस्तक व्हावं लागत आहे' असं म्हणत धनंजय मुंडे भावुक झाले होते.
advertisement
दरम्यान, मुंबईत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवडीच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सगळेच मंत्री, पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सगळेच आमदार उपस्थित होते. या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 4:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडे झाले भावुक, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पोहोचले, पहिली प्रतिक्रिया VIDEO










