Ajit Pawar : दादांची ती सावली, पुतण्याला लैय भावली,सांत्वनासाठी घेतली रोहित पवारांनी कुटुंबियांची भेट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शपथविधी सूरू होण्याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे विश्वासू अंगरंक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.
Rohit Pawar meet Ajit Pawar Body Guard Family : महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादीत घडामोडींना वेग आला आहे.त्यानुसार आज सुनेत्रा पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उप मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यामुळे आता सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उप मुख्यमंत्री ठरल्या आहेत.दरम्यान हा शपथविधी सूरू होण्याआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे विश्वासू अंगरंक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. या भेटीत रोहित पवार यांनी घडलेल्या घटनेतून जाधव कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
खरं तर बुधवारी सकाळी अजित पवार बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला.अजित पवारांसोबत झालेल्या या विमान अपघातात आणखी चार जणांचाही मृ्त्यू झाला होता.यामध्ये एक अजित पवार यांचे विश्वासू अंगरक्षक विदीप दिलीपराव जाधव यांचा देखील समावेश होता. मागच्या 7 वर्षापासून विदीप जाधव अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.आणि बुधवारी ही सावली देखील अजित पवारांसोबत विरली.विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री सातार्यातील त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकल्याने मुखाग्नी दिला होता. त्यामुळे हे दृष्य पाहून अनेकांना भरून आलं होतं.
advertisement
दरम्यान आज सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
कोण होते विदीप जाधव?
महाराष्ट्राच्या पोलीस दलात विदीप जाधव हे 2009 मध्ये दाखल झाले होते. चोख काम करण्याची पद्धत आणि शिस्त यामुळे विदीप यांना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. न्यायाधीश जे.एन.सानप यांचे अंगरक्षक म्हणून विदीप यांनी 2010 ते 2013 या काळात काम केले.त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर 2019 पासून विदीप जाधव आज अखेर अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 6:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : दादांची ती सावली, पुतण्याला लैय भावली,सांत्वनासाठी घेतली रोहित पवारांनी कुटुंबियांची भेट










