Actor Divorce: अभिनेता वरुणचा घटस्फोट, लग्नाच्या 12 वर्षांनी मोडला संसार

Last Updated:

Actor Divorce: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी त्याने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून चाहत्यांना या बातमीने धक्काच बसला.

अभिनेता वरुणचा घटस्फोट
अभिनेता वरुणचा घटस्फोट
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी त्याने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून चाहत्यांना या बातमीने धक्काच बसला.
लोकप्रिय टीव्ही अभिनेता वरुण कपूर आणि त्याची पत्नी धन्या मोहन यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आलीय. 2013 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने आता 12 वर्षांनंतर घटस्फोट घेतलाय.
ETimes च्या वृत्तानुसार, दोघांचा घटस्फोट दोन आठवड्यांपूर्वीच झाला आहे. मात्र अजूनपर्यंत ना वरुण, ना धन्या यांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे. माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण वरुणशी संपर्क होऊ शकला नाही.
advertisement
वरुण कपूरने लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. "स्वरागिनी: जोडे रिश्तों के सूर", "सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल" यांसारख्या शोमध्ये त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. तसेच तो संजय लीला भन्साळी यांच्या "गंगूबाई काठियावाडी" चित्रपटात आलियाभट्टसोबत झळकला होता.
advertisement
काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत वरुणने त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी सांगितले होते. तो म्हणाला होता, "धन्या सतत प्रवास करते आणि मी शूटिंगमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता येत नाही. महिन्यातील अर्धा वेळ मी एकटाच घरी असतो. पण आमच्यात योग्य अंतर आहे आणि समजूतदारपणा."
मराठी बातम्या/मनोरंजन/
Actor Divorce: अभिनेता वरुणचा घटस्फोट, लग्नाच्या 12 वर्षांनी मोडला संसार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement