बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच पोलीस बनली अभिनेत्री, ओळखलं का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Actress Become Police : अभिनेत्रीने बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाच गाजवला. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर ती थेट पोलिसांच्या वेशात दिसली आहे.
मुंबई : बिग बॉस हा रिअलिटी शो अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दितो. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूप लोकप्रिय झाला. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवणारी एक प्रसिद्ध अभिनेत्री बाहेर येताच पोलीस इन्स्पेक्टर बनली आहे. अभिनेत्रीचा पोलीस वेशातील लूक समोर आला आहे.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती बिग बॉस मराठीची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर आहे. अभिनेत्रीने बिग बॉसचा सीझन तर गाजवला. बिग बॉसनंतर जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जान्हवी किल्लेकर स्टार प्रवाहवरील एका मालिकेत एंट्री घेणार आहे. मालिकेतील जान्हवीचा पहिला लुक सर्वांसमोर समोर आला आहे. जान्हवीच्या आतापर्यंतच्या भुमिकांमधील तिची ही भुमिका वेगळी ठरणार आहे. कारण जान्हवी यात महिला पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत दिसणार आहे. अबोली मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे. मालिकेत इन्सपेक्टर दिपशिखा भोसले आणि शिवांगी देशमाने यांची एण्ट्री होणार आहे. इन्सपेक्टर दिपशिखाची भूमिका अभिनेत्री जान्हवी किल्लेकर साकारणार आहे तर शिवांगी देशमानेची भूमिका अभिनेत्री मयुरी वाघ साकारणार आहे.
advertisement
advertisement
जान्हवी किल्लेकर साकारत असलेल्या दिपशिखा या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे. लाच घेणं किंवा एखादं बेकायदेशीर काम करणं यात तिला काही गैर वाटत नाही. जर खाकी घालून मी कायद्याचं रक्षण करत असेन तर या खाकीचा फायदा मला झालाच पाहिजे…! हे तिचं आयुष्याचं तत्व आहे. तिच्या कर्तबगारपणामुळेच तिच्या वाईट गोष्टी कधीच लोकांसमोर आल्या नाहीत. तिने केलेली बेकायदेशीर कामं देखील ती खूप सराईतपणे लपवते. अशा या डॅशिंग दिपशिखा भोसलेपाटीलचा एका केसच्या संदर्भात आता अबोलीसोबत सामना होणार आहे.
advertisement
दिपशिखा प्रमाणेच मयुरी वाघ साकारत असेली शिवांगी बीड मधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली आहे. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करतेय. समृद्धीचा खून झाला असेल असं लोक म्हणत असले तरी त्यावर शिवांगीचा विश्वास नाहीये. साधी- सरळ,हतबल आणि परिस्थितीने पिचलेल्या शिवांगीला अबोली आधार देते. शिवांगीच्या बहिणीच्या शोधात तिची भेट अबोली प्रमाणेच इन्सपेक्टर दिपशिखासोबत सुद्धा होते. त्यामुळे या केसला नवं वळण मिळणार आहे. अबोली ही मालिका रात्री 11 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 12:41 PM IST