VIDEO : शेकी शेकी गाण्यावर अविनाश अन् ऐश्वर्याचा 'एक नंबर' डान्स, केल्या सेम टू सेम स्टेप्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Aishwarya - Avinash Narkar : नारकर कपलचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी केलेल्या डान्सने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
मुंबई : ऐश्वर्या आणि अविनाश हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल सध्या व्हिएतनाममध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यांच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत दोघेही संजू राठोडच्या 'शेकी शेकी' या गाण्यावर उत्साहाने नाचताना दिसत आहेत. नारकर कपलच्या या डान्सने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हनॉईमध्ये नारकर जोडीची धमाल
ऐश्वर्या आणि अविनाश यांनी व्हिएतनाममधील हनॉई येथील हलॉन्ग बे येथे हा व्हिडीओ शूट केला आहे. ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाचा स्टायलिश वन-पीस परिधान केला असून त्या खूपच आकर्षक दिसत आहेत. तर अविनाश यांनी व्हाइट टी-शर्ट आणि कूल लूकमधील स्वॅगने सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांच्या या व्हिडीओला त्यांनी Let's enjoy... Evening at #halongbay असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओत त्यांची केमिस्ट्री आणि उत्साह प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
advertisement
चाहत्यांची पसंती आणि सोशल मीडियावर कौतुक
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर होताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी त्यांच्या डान्सची आणि स्टाइलची प्रशंसा केली आहे. एकानं लिहिलंय, "ऐश्वर्या मॅम नेहमीच स्टनिंग दिसतात." तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलंय, "मिस्टर आणि मिसेस नारकर ऑलवेज रॉक". नारकर कपलच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
advertisement
advertisement
व्हिएतनाममधील नारकर कपलची परदेशवारी
ऐश्वर्या आणि अविनाश यांनी यापूर्वीही त्यांच्या परदेशवारीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. व्हिएतनाममधील व्हिडीओमध्ये त्यांच्या ट्रिपमधील एक खास क्षण त्यांनी शेअर केला होता. त्यांच्या व्हिडीओने चाहत्यांना व्हिएतनामच्या सुंदर ठिकाणांची झलक दाखवली.
ऐश्वर्या आणि अविनाश यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने आणि साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या व्हिडीओत त्यांनी दाखवलेला उत्साह आणि मराठी गाण्यावरचा डान्स यामुळे त्यांच्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम आणखी वाढलं आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओने पुन्हा एकदा सिद्ध केलं की,नारकर जोडी कायमच चाहत्यांच्या मनात घर करते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 2:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : शेकी शेकी गाण्यावर अविनाश अन् ऐश्वर्याचा 'एक नंबर' डान्स, केल्या सेम टू सेम स्टेप्स


