Alia Bhatt: आलिया भट्टसोबत महिलेचं धक्कादायक कृत्य, भरगर्दीत हात ओढून स्वतःकडे खेचलं अन्... VIDEO VIRAL
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Alia Bhatt: आलिया भट्ट अलीकडे मुंबईतील प्रसिद्ध मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गापूजा पंडालात दिसली. आलिया इथे दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी आली होती. मात्र यावेळी अभिनेत्रीसोबतच धक्कादायक प्रकार घडलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडे मुंबईतील प्रसिद्ध मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गापूजा पंडालात दिसली. आलिया इथे दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी आली होती. मात्र यावेळी अभिनेत्रीसोबतच धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिला चाहतीने आलियाच्या हाताल पकडून ओढून घेतलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पूजा संपवून जेव्हा आलिया बाहेर पडू लागली, तेव्हा प्रेक्षकांची मोठी गर्दी तिच्या भोवती जमली. अंगरक्षक तिला सुरक्षितरित्या बाहेर काढत होते, तेव्हा लाल साडीतील एका महिलेने अचानक आलियाचा हात ओढला. परिस्थिती गंभीर होऊ शकली असती, पण आलियाने खूप संयम दाखवला. अंगरक्षक त्या महिलेला दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण आलियाने त्यांना थांबवलं आणि शांततेने परिस्थिती हाताळली.
advertisement
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक आलियाच्या संस्कार आणि संयमाचं कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं, “सुपरस्टार असूनही खूप आदर दाखवला.” दुसऱ्याने म्हटलं, “असं वागणं चुकीचं आहे, पण आलियाने कमाल केली.” आणखी एकाने लिहिलं, “यालाच संस्कार म्हणतात. तिनं जबरदस्त उदाहरण दिलं.”
advertisement
advertisement
पांढऱ्या बॉर्डर असलेली लाल रंगाची पारंपरिक साडी, साधा मेकअप आणि गजऱ्यासह आलेली आलिया पंडालात सगळ्यांच्या नजरा खेचून घेत होती. चाहत्यांनी तिच्या या देसी आणि एलिगंट लूकचं खूप कौतुक केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 1:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Alia Bhatt: आलिया भट्टसोबत महिलेचं धक्कादायक कृत्य, भरगर्दीत हात ओढून स्वतःकडे खेचलं अन्... VIDEO VIRAL