'आणखी एक मित्र सोडून गेला', सतीश शाह यांच्या निधनानंतर गहिवरले अमिताभ बच्चन, इमोशनल पोस्ट वाचून रडू येईल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Satish Shah Death : सतीश शाह यांच्या निधनाने मुंबईसह देशभरात शोककळा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमिताभ बच्चन व अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. अंतिम संस्कार पवन हंस स्मशानभूमीत.
मुंबई : आपल्या हसऱ्या चेहऱ्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आनंद देणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर केवळ कलाविश्वातूनच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांनी सतीश शाह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पवन हंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार
सतीश शाह यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम प्रवासापूर्वी त्यांचे पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. यावेळी त्यांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित असतील.
advertisement
advertisement
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडने पंकज धीर आणि गोवर्धन असरानी यांसारखे कलाकार गमावले आहेत. याच शोकाकुल वातावरणात सतीश शाह यांच्या जाण्याने इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अमिताभ बच्चन यांची हृदयस्पर्शी पोस्ट
एकामागून एक मित्रांना गमावल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन खूप भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सतीश शाह यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. बच्चन यांनी लिहिले, "आणखी एक दिवस, आणखी एक कार्य, आणखी एक शांतता... आपल्यापैकी आणखी एक जण निघून गेला. सतीश शाह... एक तरुण प्रतिभा... अगदी कमी वयात आपल्याला सोडून गेला."
advertisement

या कठीण काळात आपण सामान्यपणे व्यक्त होऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, "या कठीण काळात, 'शो मस्ट गो ऑन' या जुन्या शब्दांचे पालन करण्यातच सहजता आहे. त्याप्रमाणे आयुष्यही तसेच पुढे चालत राहिले पाहिजे."
कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
सतीश शाह यांच्या जाण्याने अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. माधुरी दीक्षित, हृतिक रोशन, विवेक ऑबेरॉय, करण जोहर, आर माधवन, अली असगर, रणदीप हुड्डा, रणवीर शोरी, सोफी चौधरी, राजकुमार राव आणि परेश रावल यांसह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या लाडक्या सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आणखी एक मित्र सोडून गेला', सतीश शाह यांच्या निधनानंतर गहिवरले अमिताभ बच्चन, इमोशनल पोस्ट वाचून रडू येईल


