Aryan Khan Girlfriend : शाहरुखचा लेक प्रेमात, 8 वर्षांनी मोठ्या मॉडेलला डेट करतोय आर्यन खान; कोण आहे 'ती'?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Who is Larissa Bonesi : आर्यन खानने 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलंय. नुकतचं याच्या प्रीमियरदरम्यान आर्यन खानची रूमर्ड गर्लफ्रेंड लारिसा बोन्सीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Aryan Khan Rumored Girlfriend Larissa Bonesi : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान सध्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे चर्चेत आहे. नुकताच सेलिब्रिटींच्या मांदियाळीत या सीरिजचा दिमाखदार प्रीमिअरसोहळा पार पडला. या प्रीमियरमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती आर्यन खानची रूमर्ड गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी हिची. लारिसा बोन्सीने आपल्या हटके स्टाईलने उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमिअरसाठी लारिसाने खास लूक केला होता. लारिसाने खास आर्यनसोबत ट्विनिंग केलं होतं. काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. नेटकऱ्यांनीही लारिसाची वाहवा केली आहे.
लारिसाचे इंस्टाग्रामवर 654K फॉलोअर्स आहेत. यापैकी एक आर्यन खान आहे. तसेच सुहाना खान आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा डडलानीदेखील लारिसाला फॉलो करते. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन आणि लारिसा यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. वर्षाच्या सुरुवातीला 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा पहिला लूक समोर आला होता. त्यावेळी लारिसाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' संदर्भातील अपडेट शेअर केली होती. पुढे आर्यनने ही पोस्ट रि-पोस्ट केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने आर्यन आणि लारिसाच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली.
advertisement
लारिसा बोन्सी कोण आहे?
लारिसा बोन्सीचा जन्म 28 मार्च 1990 मध्ये ब्राजीलमध्ये झाला. वयाच्या 13 व्या वर्षी तिने चीनमध्ये जात मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली. 2011 मध्ये लारिसा मुंबईत आली आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'देसी बॉइज' या चित्रपटातील 'सुबहा होने ना दे' या गाण्यात लारिसाची पहिली झलक पाहायला मिळाली होती. पुढे 2016 मध्ये 'थिक्का' या तेलुगू चित्रपटात मुख्य भूमिकेत ती झळकली. लारिसाने हिंदी, तेलुगू चित्रपटांसह अनेक म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरांतींतदेखील काम केलं आहे.
advertisement
लारिसा बोन्सी आतापर्यंत 'गो गोवा गॉन','थिक्का','नेक्स्ट एन्ट्री' आणि 'पेंटहाऊस' अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. त्यासह 'सुरमा सुरमा','जाम' आणि 'आओ ना' सारख्या म्युझिक अल्बममध्येही तिने अभिनय केला आहे. तिने विवेल, निविया, महिंद्रा गस्टो आणि लेव्हिस सारख्या मोठ-मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केली आहे. आर्यन खानच्या 'D’YAVOL X' या ब्रँडच्या प्रिन्ट जाहिरातीतदेखील ती दिसून आली आहे. आजवर 10 पेक्षा जास्त चित्रपट आणि व्हिडीओ प्रोजेक्टमध्ये तिने काम केलं आहे.
advertisement
आर्यन आणि लारिसा यांच्या वयातही खूप अंतर आहे. आर्यन खानचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 मध्ये झालाय. तर लारिसाचा जन्म 28 मार्च 1990 मध्ये झालाय. त्यामुळे एकंदरीतच दोघांमध्ये जवळपास आठ वर्षांचं अंतर आहे. अद्याप अधिकृतरित्या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. पण अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा चांगल्या रंगल्यात.
advertisement
लारिसा बोन्सीचं नेटवर्थ किती?
लारिसा बोन्सी एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुअंसर म्हणून सक्रीय आहे. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ती काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लारिसा बोन्सीची एकूण संपत्ती जवळपास चार कोटींच्या आसपास आहे. लारिसा फिटनेसप्रेमी आहे. तसेच विविध ठिकाणी फिरायलाही तिला आवडतं. इंस्टाग्रावर लारिसा आपले वर्कआऊटचे किंवा कामासंदर्भातील अपडेट्स शेअर करत असते. आपल्या कारकिर्दीने तिने जगभरात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 1:30 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aryan Khan Girlfriend : शाहरुखचा लेक प्रेमात, 8 वर्षांनी मोठ्या मॉडेलला डेट करतोय आर्यन खान; कोण आहे 'ती'?