जबरदस्त मसल्स, 6 पॅक ॲब्स, 60मध्येही भाईजानचा जलवा! सलमान खानच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं टेम्प्रेचर
- Published by:Pratiksha Pednekar
 
Last Updated:
Salman Khan Fitness : अभिनयासोबतच आपल्या दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या सलमानने, आता या ट्रान्सफॉर्मेशनचे गुपित चाहत्यांसमोर उघड केले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या बहुप्रतीक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच आपल्या दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या सलमानने, आता या ट्रान्सफॉर्मेशनचे गुपित चाहत्यांसमोर उघड केले आहे.
सलमान खानने आज त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचे दमदार मसल आणि सिक्स पॅक ॲब्स दिसत आहेत. पहिल्या फोटोत सलमान आरशात स्वतःला पाहताना दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर घाम आहे. दुसऱ्या फोटोत सलमान त्याचे ॲब्स दाखवत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही फोटोंमध्ये त्याच्या गळ्यात नेहमीची चैन दिसत आहे, पण तो नेहमी घालतो ते आवडीचे ब्रेसलेट मात्र त्याच्या हातात दिसत नाहीये.
advertisement
याच फोटोंसोबत सलमानने एक अत्यंत मजेदार आणि खास कॅप्शन दिले आहे, ज्यातून त्याने फिटनेसचे रहस्य उघड केले. त्याने लिहिले आहे, "कुछ हासिल करने के लिए कुछ छोड़ना पड़ता है... ये बिना छोड़े है." या कॅप्शनमधून सलमानने जास्त त्याग न करताही त्याने जबरदस्त बॉडी बनवल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
advertisement
advertisement
'बॅटल ऑफ गलवान'ची तयारी
६० च्या उंबरठ्यावर असलेल्या सलमानची ही लेटेस्ट बॉडी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाच्या तयारीचा भाग आहे. नुकतंच त्याने अपूर्वा लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाचे लडाखमधील शेड्यूल पूर्ण केले आहे आणि सध्या तो मुंबईत शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान शहीद कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षावर आधारित असणार आहे. यामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह देखील दिसणार आहे.
advertisement
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सलमानच्या या दमदार फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले, "सलमान भाई पुन्हा एकदा सिद्ध करत आहे की तो फिटनेसचे ट्रेंडसेटर का आहे." तर दुसऱ्याने लिहिले, "भाईच्या जलव्याने हेटर्स जळून राख झाले आहेत."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:08 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जबरदस्त मसल्स, 6 पॅक ॲब्स, 60मध्येही भाईजानचा जलवा! सलमान खानच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं टेम्प्रेचर


