2450 कोटींच्या चित्रपटाचा 2 मिनिट 35 सेकंदाचा ट्रेलर रिलीज! फक्त पाच दिवसांत रचणार इतिहास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Baahubali: The Epic Trailer : बॉलिवूडच्या 'बाहुबली:द एपिक' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट रुपेरी पडद्यावर इतिहास रचणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
Baahubali: The Epic Trailer Out : ‘बाहुबली: द एपिक’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता रुपेरी पडद्यावर धमाका करणार आहे. या चित्रपटात ‘बाहुबली 1’ आणि ‘बाहुबली 2’ हे दोन्ही भाग एकत्र करण्यात आले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाचे भव्य सेट, युद्धदृश्ये आणि जबरदस्त कथानकाची झलक स्पष्टपणे दिसते. 2 मिनिटे 35 सेकंदांचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता दुपटीने वाढली आहे. या चित्रपटाची कथा प्रेम, संघर्ष आणि राज्यसत्तेभोवती फिरते. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. दोन्ही चित्रपटांनी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. ‘बाहुबली 1’ हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले. या चित्रपटाने सुमारे 600-650 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्स, कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. ‘बाहुबली 1’ ने भारतीय सिनेमात एपिक शैलीतील चित्रपटांसाठी एक नवा टप्पा निर्माण केला. या चित्रपटातील गाणी आणि युद्धदृश्ये आजही लोकांच्या मनात कोरली गेली आहेत.
धमाकेदार ट्रेलर आऊट!
आता दोन्ही भागांना एकत्र करून ‘बाहुबली: द एपिक’ हा सुमारे 2,450 कोटींचा चित्रपट मानला जात आहे. कमाईचा हा आकडा दर्शवतो की या फ्रँचायझीनं भारतीय सिनेमावर किती मोठी छाप सोडली आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच प्रेक्षकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या संख्येने लोक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळतील. चित्रपटाची कथा आणि व्हिज्युअल्स पाहता, तो केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. ट्रेलरमध्ये चित्रपटाची भव्यता स्पष्टपणे दिसते. मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा ते जुने सुवर्ण दिवस परत येणार आहेत.
advertisement
advertisement
पाच दिवसांत रुपेरी पडद्यावर इतिहास रचला जाणार
view commentsट्रेलरवरून स्पष्ट दिसतं की चित्रपटात अॅडव्हेंचर, रोमांच आणि ड्रामा यांचा उत्तम संगम आहे. प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत की ही कथा मोठ्या पडद्यावर कशी जिवंत होते. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोर ट्रेलरमध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. ‘बाहुबली: द एपिक’ हा चित्रपट 30 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही तारीख प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अशी अपेक्षा आहे की प्रेक्षक दोन्ही भागांतील रोमांच आणि भावना यांचा अनुभव एकाचवेळी घेऊ शकतील आणि हा चित्रपट किती मोठी कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2450 कोटींच्या चित्रपटाचा 2 मिनिट 35 सेकंदाचा ट्रेलर रिलीज! फक्त पाच दिवसांत रचणार इतिहास


