Ranji Trophy : रोहित शर्माने सिडनी गाजवली, इकडे मुंबईच्या खेळाडूची वादळी खेळी, 118 धावांवर नाबाद
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एकीकडे रोहित शर्मान सिडनीचं मैदान गाजवत असताना तिकडे मुंबईच्या एका खेळाडून वादळी खेळी केली आहे.या खेळाडूने 118 धावांची नाबाद शतकीय खेळी केली आहे.
Ranji Trophy 2025 :टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आज 121 धावांची नाबाद खेळी केली.त्याच्या या शतकीय खेळीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेटने पराभव केला आहे.एकीकडे रोहित शर्मान सिडनीचं मैदान गाजवत असताना तिकडे मुंबईच्या एका खेळाडून वादळी खेळी केली आहे.या खेळाडूने 118 धावांची नाबाद शतकीय खेळी केली आहे.त्याच्या या खेळीच्या बळावर संघाचा डाव 250 पार गेला आहे. दरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात गाजवणारा हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अजिंक्य रहाणे आहे. अजिंक्य रहाणे सध्या मुंबई संघाकडून छत्तीसगड विरूद्ध रणजी सामना खेळतो आहे.या सामन्यात अजिंक्य रहाणेने 118 धावांची नाबाद शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 15 चौकार मारले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात रोहित सिडनीच मैदान गाजवत असताना इकडे मुंबईत रहाणेने खतरनाक खेळी केली.
advertisement
AJINKYA RAHANE SCORED A HUNDRED IN THE RANJI TROPHY. pic.twitter.com/xCh9UGSntj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2025
खरं तर मुंबईची सूरूवात खराब झाली होती. कारण सलामीवीक अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खान स्वस्तात बाद झाले होते. त्यामुळे त्यांच्यानंतर मैदानात उतरणाऱ्या अजिंक्य रहाणेने 118 धावांची शतकीय खेळी केली. ही खेळी केल्यानंतर तो आऊट झाला नाही तर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्यानंतर सिद्धेश लाडने 80 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार मारले होते. सध्या शम्स मुलानी आणि आकाश आनंद हे दोन खेळाडू मैदानावर आहेत. आणि मुंबईने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 251 धावा केल्या आहेत. आता मुंबईचा संघ आणखी किती धावापर्यंत मजल मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
मुंबईचा संघ :
मुशीर खान, हिमांशू सिंग, सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान,अंगकृष्ण रघुवंशी,शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर (क),आकाश आनंद (wk),तुषार देशपांडे, इरफान उमैर
छत्तीसगडचा संघ :
आयुष पांडे, आशुतोष सिंग, संजीत देसाई, अमनदीप खरे (क), शशांक सिंग,शशांक चंद्राकर (wk), अजय जाधव मंडळ, आदित्य सरवटे, वासुदेव बरेथ, रवी किरण,सौरभ मजुमदार
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 8:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : रोहित शर्माने सिडनी गाजवली, इकडे मुंबईच्या खेळाडूची वादळी खेळी, 118 धावांवर नाबाद


