'Bigg Boss 19' कोण जिंकणार? घराबाहेर पडताच नतालियाने केलं जाहीर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम सुरू होऊन आता चौथा आठवडा सुरू आहे. अशातच हा सीझन कोण जिंकणार हे घराबाहेर पडणात नतालियाने सांगितलं आहे.
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या घरात या वीकेंडच्या वारी सलमानच्या अनुपस्थितीत नतालिया आणि नगमा या दोघींना घराचा निरोप घ्यावा लागला आहे. या आठवड्यात बॉलिवूड गाजवणारी फराह खान होस्ट करताना दिसून आली. दुसरीकडे गौरव खन्ना आणि अशनूर कौरसारखे सदस्यही घरात अद्याप सक्रीय झालेले दिसून येत नाहीत. तर सिद्धार्थ घरातील इतर सदस्यांसोबत आराम करताना किंवा गॉसिप्स करताना दिसून येत आहे. अशनूरदेखील घरातील इतर काही गोष्टींमध्ये सहभागी झालेली दिसून येत नाही.
'बिग बॉस 19' कोण जिंकणार?
'बिग बॉस 19'च्या घरातील सर्वच सदस्य एकापेक्षा एक आहेत. आपल्या दमदार खेळीने यातील अनेक सदस्य खेळात शेवटपर्यंत असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मागीत आठवड्यात घराबाहेर पडलेल्या नतालियाने यंदाच्या 'बिग बॉस 19'चा विजेता कोण होणार? याबद्दल आपला अंदाज व्यक्त केला आहे. नतालियाच्या मते, 'बिग बॉस 19'ची यंदाची मानाची ट्रॉफी अशनूर, मृदुल आणि बशीरपैकी कोणी आपल्या नावे करू शकतो. नतालियाच्या मते, हे तिन्ही सदस्य या सीझनमध्ये आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रेक्षकांचा अंदाज मात्र वेगळाच आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात नतालिया अशनूर, मृदुल आणि बशीर यांच्या जवळ होती.
advertisement
टॉप 5 मध्ये 'या' स्पर्धकांच्या नावाची चर्चा!
एविक्शनच्या काही वेळाआधी मृदुलने नतालियासोबत संवाद साधला होता. 'बिग बॉस 19'च्या घरात ज्या सदस्यांची 'टॉप 5'मध्ये चर्चा होते त्यांच्यात अभिषेक बजाज पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्यावर बशीर आहे. तर वादाच्या भोवऱ्यात अडकलेली फरवाना सध्या घरातील मंडळींचं चांगलच मनोरंजन करत असून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. गौरव खन्ना चौथ्या स्थानी आहे. तर अमाल मलिक पाचव्या क्रमांकावर आहे.
advertisement
'बिग बॉस 19'मध्ये मोठा ट्विस्ट
'बिग बॉस'च्या घरात कधीही काहीही होऊ शकतं. ही गोष्ट पुन्हा एकदा खरी ठरली आहे. या सीझनच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे सगळ्या स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. घरातील सदस्यांच्या चुकांमुळे बिग बॉसने असा निर्णय घेतला की, आता घरातील प्रत्येक सदस्य बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाला आहे. 'बिग बॉस 19'चा या पर्वातील हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आतापर्यंत तीन आठवड्यांची नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्यामध्ये पहिल्या दोन आठवड्यांमध्ये कोणताही स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पण तिसऱ्या ‘वीकेंड का वार’मध्ये एक नव्हे, तर दोन स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. आणि आता चौथ्या आठवड्याचं नॉमिनेशन झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 8:44 AM IST