Bigg Boss 19: फिनाले आधीच तान्या मित्तलला लॉटरी! एकता कपूरने ऑफर केला पहिला शो, सलमान खानची रिएक्शन व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tanya Mittal got Offer from Ekta Kapoor: टीव्ही क्वीन एकता कपूर यांनी 'वीकेंड का वार'मध्ये येऊन तान्याला तिच्या आगामी शोसाठी थेट ऑफर दिली आहे.
मुंबई: 'बिग बॉस १९' चा फिनाले तोंडावर असतानाच, अभिनेत्री तान्या मित्तल हिला मोठी लॉटरी लागली आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर यांनी 'वीकेंड का वार'मध्ये येऊन तान्याला तिच्या आगामी शोसाठी थेट ऑफर दिली आहे. एकताच्या या घोषणेमुळे घरातले सदस्य आणि होस्ट सलमान खान यांच्या मजेशीर रिएक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमानच्या शोमध्ये एकता कपूरने दिली ऑफर
एकता कपूरने 'बिग बॉस १९' च्या मंचावर येऊन सांगितले की, सलमान खानच्या शोमध्ये नवीन कलाकारांना ऑफर देणे ही तिची परंपरा आहे. यावेळी तिने दोन स्पर्धकांना संधी दिली. एकता कपूर म्हणाली, "सलमान सरच्या शोमध्ये ऑफर देणे ही माझी परंपरा आहे. यावेळी मी दोन लोकांना कास्ट करू इच्छिते. त्यापैकी एक अभिनेता नाही, तो म्हणजे संगीतकार अमाल मलिक."
advertisement
यानंतर एकताने तान्या मित्तलचे नाव घेत म्हटले, "आणि दुसरी व्यक्ती - दुनिया पित्तल दी! तान्या मित्तल, मी तुम्हाला कास्ट करू इच्छिते!" एकताची ही ऑफर ऐकून तान्याला खूप आनंद झाला. "हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, मॅम. खूप खूप धन्यवाद," असे म्हणत तान्याने तिचे आभार मानले.
advertisement
Big Moment! Bigg Boss stage par Ekta Kapoor ka surprise, new app reveal aur Amaal-Tanya ko select kiya collaboration ke liye. 🤩
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par. pic.twitter.com/Wr8C4tvsEV
— JioHotstar Reality (@HotstarReality) November 22, 2025
advertisement
सलमानचा मजेदार प्रश्न
तान्याला ही मोठी संधी मिळाल्यावर होस्ट सलमान खानने गंमत केली, ज्यामुळे घरात एकच हशा पिकला. सलमान खानने तान्याला चिडवत विचारले, "गरीब मुलीचा रोल आहे, कसा करशील?" तान्याची लोकप्रियता 'बिग बॉस १९' मध्ये एंट्री केल्यापासून खूप वाढली आहे. शो संपायला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना मिळालेले हे गिफ्ट तिच्यासाठी खूप मोठे आहे.
advertisement
तान्या मित्तलने व्यक्त केली होती टीव्हीवर काम करण्याची इच्छा
काही दिवसांपूर्वीच तान्या घरात गौरव खन्ना आणि अश्नूर कौर यांच्यासोबत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याबद्दल बोलत होती. गौरव खन्नाने सांगितले होते की, तान्याच्या भावाने तिला टीव्हीमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा तान्या मस्करीत म्हणाली होती, "मला खात्री आहे की मी कोणत्याही 'बहू'च्या रोलमध्ये कास्ट होऊ शकते, टिपिकल बहू मटेरियल! आणि जर कुनिका सदानंद मॅम माझी सासू निघाल्या, तर तिथे स्क्रिप्टचीही गरज नाही!" आता एकता कपूरच्या शोमध्ये तान्या 'टिपिकल बहू' होते की 'व्हॅम्प', हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 9:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19: फिनाले आधीच तान्या मित्तलला लॉटरी! एकता कपूरने ऑफर केला पहिला शो, सलमान खानची रिएक्शन व्हायरल


