Bigg Boss 19: 'इतका मुर्खपणा...', 'वीकेंड का वार' बघून भडकली प्रसिद्ध अभिनेत्री, सलमान खानलाच धरलं धारेवर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Weekend Ka Vaar : बिग बॉस १९ मध्ये सलमान खानच्या निर्णयांवर 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध अभिनेत्रीने सडकून टीका केली असून शो बायस्ड असल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.
मुंबई : वादग्रस्त दूरचित्रवाणी कार्यक्रम 'बिग बॉस १९' मध्ये या आठवड्यात झालेल्या गोंधळानंतर 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने स्पर्धकांची नेहमीप्रमाणे शाळा घेतली. पण यावेळी स्पर्धकांना धारेवर धरण्याऐवजी, सलमान खान आणि 'बिग बॉस'चा कार्यक्रमच ट्रोल होऊ लागला आहे. या ट्रोलिंगमध्ये आता 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने उडी घेतली असून, तिने थेट सलमान आणि शोच्या निर्णयांवर सडकून टीका केली आहे.
या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात अनेक मोठे वाद झाले होते. जसे की, कुनिका सदानंदने 'सुर-सुरी' नावाचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडले. गायक अमाल मलिकने अभिनेत्री अशनूर कौरसाठी भुंकणे हा शब्द वापरला. अभिषेक बजाजने वारंवार दुसऱ्यांना चिडवले. नेहल चुडासमाने वारंवार तान्या मित्तलच्या विरोधात बोलून तिला त्रास दिला. प्रणित मोरेने बसीर अलीची खिल्ली उडवली.
advertisement
एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, चढावी लागली कोर्टाची पायरी; बाळासाहेबांनी मिटवलं प्रकरण
सलमानची 'शाळा' उलटली!
एवढे सगळे वाद झालेले असताना, 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने अमाल मलिकचे विधान तोडून-मोडून सांगितल्याबद्दल कुनिका सदानंदला आणि अमालसोबत गैरवर्तन केल्याबद्दल अभिषेक बजाजला फटकारले. या वादात अशनूर कौरलाही खेचण्यात आले. तसेच, तान्याविरोधात वारंवार बोलल्याबद्दल नेहल चुडासमाला सुनावण्यात आले. थोडक्यात सांगायचे तर, 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने तान्या मित्तल आणि अमाल मलिकचे समर्थन केले, तर इतर स्पर्धकांना दोषी ठरवले.
advertisement
Oh pleasee… just for a change i thought to watch the wkv… So many blunders & stupidity at one go… 🤦🏼♀️😒 https://t.co/v2KvLRj69n
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) October 5, 2025
देवोलीनाने उचलला आवाज
सलमान खानने अमाल मलिकला पाठिंबा दिल्याने अनेक प्रेक्षकांनी 'बिग बॉस' आणि सलमान खानवर बायस्ड असल्याचा आरोप केला. एका 'बिग बॉस'च्या फॅन पेजने अमाल आणि शहबाजचा फोटो शेअर करून लिहिले होते, "परिस्थिती चांगली हाताळल्याबद्दल सलमान खानला अमालचा अभिमान आहे." या पोस्टवर देवोलीना भट्टाचार्जीने कठोर प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, "ओह प्लीज! थोडा बदल म्हणून मी 'वीकेंड का वार' पाहिला. एकाच वेळी कितीतरी चुका आणि मूर्खपणा!" देवोलीनाच्या या विधानामुळे 'बिग बॉस'च्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 6:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19: 'इतका मुर्खपणा...', 'वीकेंड का वार' बघून भडकली प्रसिद्ध अभिनेत्री, सलमान खानलाच धरलं धारेवर