Bollywood Actors : एका रात्रीत झाले सुपरस्टार, बॉलिवूड गाजवलं! आता झालेत गायब.. कुटुंबियांकडूनही शोध सुरू
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actors : बॉलिवूडमध्ये एन्ट्री करुन स्टार झालेल्या अनेकांनी लगेचच या क्षेत्राचा रामराम घेतला आहे. कोणी 20 तर कोणी 30 वर्षांपासून गायब आहेत.
Bollywood Actors : बॉलिवूड जेवढं ग्लॅमरस आहे तेवढचं रहस्यमय आहे. काही कलाकार अल्पावधीतच या क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचतात. तर काहींना पदार्पणातच या करिअरमधून माघार घ्यावी लागते. पण बॉलिवूडचे काही कलाकार मंडळी यशाच्या शिखरावर असतानाच यातून बाहेर पडले आहेत. ही कलाकारमंडळी सध्या काय करतात ही रहस्यमय बाब आहे. गेल्या 20-30 वर्षांपासून ही कलाकार मंडळी गायब आहेत.
वीराना : जैस्मिन धुन्ना
'वीराना' या 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या भयपटापासून अभिनेत्री जैस्मिन धुन्ना चर्चेत आहे. आजही अभिनेत्री आपल्या बोल्ड लुकमुळे ओळखली जाते. पण या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री सिनेसृष्टीपासून मात्र दुरावली. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीला धमकीचे फोन यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे घरातून बाहेर पडणं अभिनेत्रीसाठी कठिण झालं होतं. त्यामुळे जैस्मिन परदेशी गेली.
advertisement
मुन्ना भाई एमबीबीएस : विशाल ठक्कर
'मुन्ना भाई एमबीबीएस',चांदनी बार सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते विशाल ठक्कर 2016 पासून गायब आहेत. विशाल ठक्कर एक चित्रपट पाहायला गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही, असे म्हटले जाते. विशाल ठक्कर घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 500 रुपये होते. आजही त्यांचे कुटुंबिय त्यांची वाट पाहत आहेत.
advertisement
हम किसी से कम नहीं : काजल किरण
'हम किसी से कम नहीं' या चित्रपटात ऋषि कपूरसोबत झळकलेली अभिनेत्री काजल किरणला कोणी विसरुच शकत नाही. काजलचे खरे नाव सुनीता कुलकर्णी असे आहे. 90 च्या दशकात अभिनेत्री 'आखिरी संघर्ष' सारख्या चित्रपटांत झळकली आहे. पण 1997 नंतर अभिनेत्री गायब झाली.
राज : मालिनी शर्मा
बिपाशा बसु आणि डीनो मोरिया स्टारर 'राज' या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मालिनी शर्मा आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीला रामराम केला. अभिनेत्रीचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला. ग्लॅमर मिळाल्यानंतर अभिनेत्रीने लगेचच इंडस्ट्री सोडली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Actors : एका रात्रीत झाले सुपरस्टार, बॉलिवूड गाजवलं! आता झालेत गायब.. कुटुंबियांकडूनही शोध सुरू