14 महिन्यांपासून UAE जेलमध्ये आहे सख्खा भाऊ; बॉलिवूड अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा भाऊ मागील 14 महिन्यांपासून UAE च्या जेलमध्ये आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे अभिनेत्रीनं तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
मिस इंडिया जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री गेली 14 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून आणि चाहत्यांपासूनही दूर आहे. तिचा सख्खा भाऊ मागील 2024 पासून UAE च्या जेलमध्ये आहे. तो फौजी असून UAE पोलिसांच्या ताब्यात आहे. भावाला सोडवण्यासाठी अभिनेत्रीनं मोठं पाऊल उचललं आहे. अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत ही माहिती सगळ्यांना दिली आहे.
सेलिना जेटली असं अभिनेत्रीचं नाव आहे. गेल्या 14 महिन्यांपासून तिचा फौजी भाऊ UAE जेलमध्ये आहे. भावाच्या सुटकेसाठी अभिनेत्री कायदेशीर लढाई लढत आहे. या प्रकरणी अभिनेत्री सेलिना हिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
advertisement
सेलिना जेटलीचा भाऊ रिटायर्ड मेजर विक्रांत कुमार जेटली यांना सप्टेंबर 2024 मध्ये UAE पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले होते. भावाला भारतात परत आणण्यासाठी सेलिनाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अलीकडील सुनावणीत न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसंच सेलिनाच्या कुटुंबीयांशी आणि UAE अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
दरम्यान सेलिना जेटलीनं नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिची बाजू मांडली. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. सेलिनाने तिचा भाऊ विक्रांतसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोसहीत तिनं भावूक पोस्ट लिहिली आहे. सेलिनाने पोस्टमध्ये लिहिलंय, "14 महिन्यांच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर दिल्ली हायकोर्टाकडून आशेची किरण दिसला आहे. जस्टिस सचिन दत्ता यांनी सरकारला नोटीस बजावली आहे. माझ्या भावाच्या प्रकरणात मदत करण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमला आहे.”
advertisement
वाचा अभिनेत्रीची संपूर्ण पोस्ट
advertisement
सेलिनाने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, "माझा भाऊ गेल्या 9 महिन्यांपासून जबरदस्तीने नजरकैदेत आहे. त्याने आपलं तारुण्य आणि जीवन देशसेवेसाठी दिलं आहे. आता भारत सरकारने आपल्या देशाच्या रक्षकांचं रक्षण करावं.”
सेलिनाच्या या भावनिक पोस्टनंतर नेटिझन्सनी तिच्या धैर्याचं आणि भावनिक संघर्षाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी भारत सरकारला मदत करण्याचं आवाहनही केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 1:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
14 महिन्यांपासून UAE जेलमध्ये आहे सख्खा भाऊ; बॉलिवूड अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल, नेमकं प्रकरण काय?


