Shafali Verma Captain : वर्ल्ड कपची फायनल जिंकवणाऱ्या 'लेडी सेहवाग'चं प्रमोशन, BCCI ने तिसऱ्याच दिवशी दिली 'गुड न्यूज'
- Published by:Saurabh Talekar
 
Last Updated:
Shafali Verma Pramoted As Captain : दुखापतग्रस्त प्रतिका रावळच्या जागी शेफालीला सेमीफायनलपूर्वी संघात स्थान देण्यात आलं होतं. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
Shafali Verma News : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी मुंबईत झालेल्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 21 वर्षीय शेफालीने 87 धावा केल्या, तसेच 36 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. या शानदार कामगिरीसाठी तिला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. भारताने फायनल सामना 52 रनने जिंकत पहिल्यांदाच वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अशातच आता फायनल जिंकवणाऱ्या शेफाली वर्माची चर्चा होताना दिसतीये. अशातच आता लेडी सेहवागला म्हणजेच शेफाली वर्माला बीसीसीआयने प्रमोशन दिलंय.
शेफालीला सेमीफायनलपूर्वी संघात स्थान
वुमेन्स वर्ल्ड कप फायनलमध्ये आपल्या उत्कृष्ट ऑलराऊंड परफॉर्मन्सने वाहवा मिळवणाऱ्या शेफाली वर्माला मोठं बक्षीस मिळालं आहे. दुखापतग्रस्त प्रतिका रावळच्या जागी शेफालीला सेमीफायनलपूर्वी संघात स्थान देण्यात आलं होतं. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सुरू होत असलेल्या सिनियर इंटरझोनल टी-20 ट्रॉफीसाठी तिची नॉर्थ झोनची कॅप्टन म्हणून निवड झाली आहे.
advertisement
India's women's World Cup winner Shafali Verma named captain of North Zone team for the Senior Inter Zonal T20 Trophy beginning in Nagaland from Tuesday pic.twitter.com/iCX3KPzt0b
— Press Trust of India (@PTI_News) November 4, 2025
शेफाली वर्माला थेट कॅप्टन केलं
advertisement
नागालँडमध्ये 4 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सिनियर वुमेन्स इंटरझोनल टी20 ट्रॉफीमध्ये एकूण 6 टीम सहभागी होणार आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) प्रादेशिक निवड समित्यांनी आपापल्या टीमची निवड केली आहे. यामध्ये शेफाली वर्माला थेट कॅप्टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सेंट्रल झोनची कॅप्टन नुजहत परवीन असेल. मीता पॉलकडे ईस्ट झोनची जबाबदारी आहे. तर अनुजा पाटिल वेस्ट झोन सांभाळेल.
advertisement
#Exclusive | “It’s the happiest moment for all of us… thanks to everyone who supported us. My teammates, coach & captain always believed in me,” says Shafali Verma (@TheShafaliVerma) to CNN-News18 @ShivaniGupta_5 speaks to the young star after her stunning win! pic.twitter.com/mRrXPG89RI
— News18 (@CNNnews18) November 4, 2025
advertisement
संधीचा पुरेपूर फायदा घेतला
दरम्यान, प्रतिका रावळच्या जागी शेफालीला थेट सेमीफायनलपूर्वी संघात सामील करण्यात आले होते. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 5 बॉलमध्ये 10 रन केले होते, पण फायनलमध्ये मिळालेल्या संधीचा तिने पुरेपूर फायदा घेतला आणि टीम इंडियाला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या शानदार कामगिरीमुळेच तिला नॉर्थ झोनच्या कॅप्टनपदी बढती मिळाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 1:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shafali Verma Captain : वर्ल्ड कपची फायनल जिंकवणाऱ्या 'लेडी सेहवाग'चं प्रमोशन, BCCI ने तिसऱ्याच दिवशी दिली 'गुड न्यूज'


