Deepikaच्या आईला जावई म्हणून नव्हता आवडला Ranveer; वर्षभर सासूला मनवत होता अभिनेता

Last Updated:

खरंतर रणवीरला दीपिका पटवण्यापेक्षा तिच्या आईला पटवणं सर्वात कठीण होतं. दीपिकाच्या आईचं नेमकं म्हणणं काय होतं माहितीये?

Deepika padukone ranveer singh wedding
Deepika padukone ranveer singh wedding
मुंबई, 26 ऑक्टोबर : अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नासंबंधी अनेक सिक्रेट उघड झाले आहेत. कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावत बॉलिवूडच्या या लव्हली कपलनं त्यांची संपूर्ण लव्हस्टोरी चाहत्यांना सांगितलं आहे. रणवीरनं राम-लीला सिनेमाच्या रिलीजनंतर लगेचच दीपिकाला प्रपोज केलं होतं. डेटींगच्या सहा महिन्यातच दीपिका आपल्यासाठी परफेक्ट आहे हे रणवीरला कळलं होतं. खरंतर रणवीरला दीपिका पटवण्यापेक्षा तिच्या आईला पटवणं सर्वात कठीण होतं. रणवीर आपला होणारा जावई आहे हे कळल्यानंतर दीपिकाच्या आईनं या प्रतिक्रिया दिली होती याबद्दल रणवीरनं सांगितलं. रणवीरनं दीपिकाला कसं प्रोपोज केलं? तिच्या आईला लग्नासाठी होकार कसा मिळवला? या सगळ्याबद्दल खुलासा केलाय.
रणवीरनं सांगितलं, मी माझ्या आई आणि बहिणीला सोबत घेऊन दीपिकासाठी एक रिंग बनवली होती. त्यानंतर मी आणि दीपिका मालदीवला सुट्टीचा प्लान केला. मालदीवमध्ये मी दीपिकाला रिंग देऊन लग्नासाठी प्रपोज केलं. दीपिकानं मला तिथल्या तिथे पटकन होकार दिला. पण खरी गोष्ट तर पुढे होती.
advertisement
रणवीर पुढे म्हणाला, "मी दीपिकाला प्रपोज केलं तिथेच आमचा सिक्रेट साखरपुडा झाला होता. त्यानंतर मालदीववरून आम्ही थेट बंगळूरूला गेलो. मी दीपिकाला नको म्हटलं होतं पण तिनं सांगायचं असं ठरवलं होतं. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तिची फॅमिली आणि काही फॅमिली फ्रेंड्स होते. तिनं सगळ्यांना सांगितलं".
advertisement
"दीपिकानं तिच्या घरी माझ्याबद्दल सांगितलं. तिच्या घरचे आनंदी होण्याऐवजी खूप नाराज झाले. कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सगळे शांत होते. थोड्या वेळाने मी माझ्या घरी गेलो. तेव्हा अम्मा दीपिकाबरोबर भांडली होती. कोण आहे हा मुलगा? त्याने तुला प्रपोज केलं आणि तू त्याला हा बोलली, असं म्हणत ती तिच्यावर खूप रागवली. सुरूवातीला दीपिकाची आई आमच्या नात्यासाठी तयार नव्हती. मी दीपिकाच्या लायक होण्यासाठी खूप मेहनत घेतली. वर्षभर मी दीपिकाच्या आईची मनधरणी केली. एक वर्षांनं त्यांनी आमचं नातं स्वीकारलं. आज मी दीपिकाच्या आईचा सगळ्यात आवडता व्यक्ती आहे", असंही रणवीर म्हणाला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Deepikaच्या आईला जावई म्हणून नव्हता आवडला Ranveer; वर्षभर सासूला मनवत होता अभिनेता
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement