Dhanashree Verma : 'लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच पकडलं...' धनश्री वर्माचा युजवेंद्र चहलवर चीट केल्याचा आरोप; VIDEO VIRAL

Last Updated:

Dhanashree Verma : क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांनी घटस्फोट घेतला. मात्र यामागे नेमकं काय कारण होतं हे कधीच समोर आलं नाही.

 धनश्री वर्माचा युजवेंद्र चहलवर चीट केल्याचा आरोप
धनश्री वर्माचा युजवेंद्र चहलवर चीट केल्याचा आरोप
मुंबई :  क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांनी घटस्फोट घेतला. मात्र यामागे नेमकं काय कारण होतं हे कधीच समोर आलं नाही. दोघांनीही परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र आता धनश्री वर्माने पहिल्यांदाच याविषयी मौन सोडलं. तिने लग्नानंतर दोन महिन्यातच हे नातं टिकणार नाही हे कळल्याचं सांगितलं.
सध्या धनश्री, अश्नीर ग्रोव्हरच्या रिअॅलिटी शो "राईज अँड फॉल" मध्ये सहभागी झाली आहे. शोच्या नवीन भागात तिने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. धनश्रीच्या म्हणाली, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिला युजवेंद्रच्या आयुष्यात काहीतरी बिनसलंय असं जाणवलं. तिला तो फसवत असल्याचंही तेव्हा समजलं. तरीही, दोघांनी नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी चार वर्षांनी हे लग्न तुटलं.
advertisement
कुब्रा सैतसोबत गप्पा मारताना धनश्रीने सांगितलं की, “मला दुसऱ्या महिन्यातच कळलं होतं की हे लग्न टिकणार नाही.” कुब्राने आश्चर्य व्यक्त करत विचारलं की इतक्या लवकर का? त्यावर धनश्रीने थोडक्यात उत्तर दिलं, “कधी कधी वेळ न घालवता सत्य समोर येतं.” या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहतेही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण धनश्रीच्या धैर्याचं कौतुक करत आहेत, तर काही चहलच्या बाजूने उभे राहत आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, याआधी शोमध्येच धनश्रीने पोटगीबाबतच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तिने सांगितलं, “आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. कोणतीही पोटगी नव्हती. अफवा पसरवल्या गेल्या होत्या, पण त्यात काहीही सत्य नाही.”
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhanashree Verma : 'लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच पकडलं...' धनश्री वर्माचा युजवेंद्र चहलवर चीट केल्याचा आरोप; VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement