'धुरंधर'चा जलवा सातासमुद्रापार! रणवीरच्या 'शरारत'वर निक जोनसचा राडा; 'जीजू'ची 'ती' कमेंट पाहून फॅन्स झाले फिदा!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nick Jonas Dance on Dhurandhar Song: भारतात या चित्रपटाने कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असतानाच, आता या 'धुरंधर'ची क्रेझ सातासमुद्रापार थेट अमेरिकेत पोहोचली आहे.
मुंबई: आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. भारतात या चित्रपटाने कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असतानाच, आता या 'धुरंधर'ची क्रेझ सातासमुद्रापार थेट अमेरिकेत पोहोचली आहे. याचं कारण ठरला आहे तो म्हणजे आपला 'ग्लोबल जीजू' निक जोनस!
प्रियांका चोप्राचा पती आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सध्या इंटरनेटवर धिंगाणा घातला आहे. निक चक्क 'धुरंधर' चित्रपटातील गाजलेल्या 'शरारत' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
निक जोनसचं 'Pre Show Hype Song'
निक जोनसने आपल्या 'जोनस ब्रदर्स' या बँडसोबत एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये निक गाण्यातील हुकस्टेप्स करण्याचा प्रयत्न करत असून मागे त्याचे भाऊ त्याला साथ देत आहेत. निकने या व्हिडिओला "New pre-show hype song unlocked" असं कॅप्शन दिलं आहे. म्हणजेच, आता स्टेजवर परफॉर्मन्सआधी स्वतःला चार्ज करण्यासाठी निक जोनस चक्क 'धुरंधर'च्या गाण्यांचा आधार घेत आहे.
advertisement
advertisement
हे गाणं मधुबंती बागची आणि जॅस्मिन सँडलस यांनी गायलं असून, शाश्वत सचदेवने संगीतबद्ध केलं आहे. स्क्रीनवर आयशा खान आणि क्रिस्टल डिसूजा यांच्या ठुमक्यांनी या गाण्याला आधीच लोकप्रिय केलं होतं, पण आता निक जोनसच्या एंट्रीने या गाण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.
advertisement
रणवीर सिंगची कमेंट अन् 'जीजू-साले'चं प्रेम!
निक जोनसचा हा डान्स पाहून आपला 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंग गप्प बसणं शक्यच नव्हतं. रणवीरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, "Hahahahahaa JIJUUUU JAAANE DEEEEE." रणवीरने निकला प्रेमाने 'जीजू' म्हटल्याने भारतीय चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला.
निकनेही याला तितक्याच आपुलकीने उत्तर दिलं. तो म्हणाला, "भावा! आता पुढचं गाणं 'धुरंधर'चं टायटल ट्रॅक आहे! तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खूप प्रेम. लेट्स गो!" हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील या 'जीजू-साले'ची ही केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा धुमाकूळ
५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या दोन आठवड्यांत ४६०.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल अशा तगड्या स्टारकास्टमुळे हा सिनेमा २०२५ मधील सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे. चित्रपटातील 'ऑपरेशन लियारी'चा थरार प्रेक्षकांना थिएटर्सकडे खेचून आणत आहे. ज्या वेगाने हा चित्रपट कमाई करत आहे, ते पाहता लवकरच हा वर्षातील सर्वात मोठा सिनेमा ठरेल यात शंका नाही. निर्मात्यांनी आधीच घोषणा केली आहे की, 'धुरंधर'चा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'धुरंधर'चा जलवा सातासमुद्रापार! रणवीरच्या 'शरारत'वर निक जोनसचा राडा; 'जीजू'ची 'ती' कमेंट पाहून फॅन्स झाले फिदा!









