मुंबईत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर 4 गोळ्या झाडल्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Firing At Out Side Rohit Shetty House: शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील जुहू परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Firing At Out Side Rohit Shetty House: शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील जुहू परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास रोहित शेट्टीच्या घराबाहेर चार राउंड फायर केले आहेत.
या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. तसेच कोणतेही मोठे जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे. परिसर सील करण्यात आला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईतील जुहूच्या पॉश एरियात रोहित शेट्टीचं घर आहे. याला "शेट्टी टॉवर्स" म्हणूनही ओळखलं जातं. ही एक १० मजली इमारत आहे. अनेक प्रमुख बॉलिवूड स्टार्स तिथे राहत असल्याने इथे आधीच सुरक्षा कडक असते.
advertisement
पोलिस सूत्रांनुसार, तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आणि जवळच्या साक्षीदारांची चौकशी केली जात आहे. अद्याप कोणत्याही टोळीने किंवा व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हल्लेखोरांची ओळख आणि हेतू निश्चित करण्यासाठी सर्व बाजुने तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे आणि सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 7:02 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मुंबईत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर 4 गोळ्या झाडल्या









