advertisement

पुणे हादरलं! पती कामाला गेला की तो घरात घुसायचा अन्...; 8 महिन्यांनी खुलासा होताच सरकली पायाखालची जमीन

Last Updated:

"घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तुझ्या पतीला आणि लहान मुलीला जिवंत सोडणार नाही," अशी भीती दाखवून आरोपीने हा गुन्हा केला.

घरात घुसून महिलेवर अत्याचार (AI Image)
घरात घुसून महिलेवर अत्याचार (AI Image)
पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका २३ वर्षीय महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. "घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तुझ्या पतीला आणि लहान मुलीला जिवंत सोडणार नाही," अशी भीती दाखवून आरोपीने हा गुन्हा केला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आठ महिन्यांपासून सुरू होता छळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह आंबेगाव परिसरात वास्तव्यास आहे. साधारण आठ महिन्यांपूर्वी, जेव्हा पीडितेचा पती कामासाठी घराबाहेर गेला होता, तेव्हा मुख्य आरोपी गुरू दोडमणी याने घरात प्रवेश केला. त्याने पीडितेच्या पती आणि मुलीचा जीव घेण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. आपल्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण होईल, या भीतीने पीडितेने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही.
advertisement
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने धैर्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुरू दोडमणी (वय २५), मयूर (वय २६) आणि दीपक काटकर (वय २४) या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लिपाणे वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलीस तपास सुरू
या गंभीर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी चक्रं फिरवली असून, पीडितेचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! पती कामाला गेला की तो घरात घुसायचा अन्...; 8 महिन्यांनी खुलासा होताच सरकली पायाखालची जमीन
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement