advertisement

क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम! हेमंत ढोमेचा नवा सिनेमा; कोकणात या ठिकाणी सुरू आहे शूटींग

Last Updated:

Hemant Dhome : शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचं शूटींग निसर्गरम्य कोकणातील एका प्रसिद्ध ठिकाणी सुरू आहे. 

News18
News18
मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे त्याच्या नव्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फर्स्टक्लास दाभाडेनंतर हेमंत एका नव्या विषयावर सिनेमा काढतोय.  मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या सिनेमाचं शूटींग सुरू झालं. हेमंत ढोमे हा सिनेमा दिग्दर्शिक करत आहे.  शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचं शूटींग निसर्गरम्य कोकणातील एका प्रसिद्ध ठिकाणी सुरू आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, "आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल."
advertisement
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, "आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे."
advertisement
नेहमीप्रमाणे क्षिती जोगनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. चलचित्र मंडळी निर्मित या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. या सिनेमात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या सिनेमाचं शूटींग कोकणातील अलिबाग येथे सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम! हेमंत ढोमेचा नवा सिनेमा; कोकणात या ठिकाणी सुरू आहे शूटींग
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement